मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात. ते आजच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. इतकंच नाहीतर सकाळपासून राज्यात महत्त्वाच्या राजकीय बैठका सुरू होत्या. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते हे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही सगळ्यात मोठी बातमी आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांना २५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद तर त्यांच्यासोबत ९ मंत्र्याचा शपथविधी होणार असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याच्या बातम्या समोर येत असून आता थोड्या वेळातच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे.

Ajit Pawar : मोठी बातमी: राज्याच्या राजकारणात भूकंप, अजित पवार राजभवनाकडे, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?
रविवारी, १ जुलै रोजी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे दोन्ही कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यासोबतच दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दौलत दोराडा आदी नेते पोहोचले आहेत. बैठक आटोपल्यानंतर अजित पवार घरातून थेट राजभवनाकडे रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here