मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार अशी चर्चेमुळे संशयाच्या फेऱ्यात असलेले अजित पवार अखेर रविवारी शिंदे-फडणवीस सरकारला जाऊन मिळाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार असल्याचे सांगितले जाते. शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदाची आणि त्यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या ८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. अजित पवार यांच्या या कृतीमुळे साहजिकच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. मात्र, या सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार मात्र बऱ्यापैकी निर्धास्त असल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या परिस्थितीवर भाष्य केले.

यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आमदार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले. जो लोक पक्षाच्या चौकटीत होते, त्यांच्याबाबत निर्णय घ्यावाच लागेल, असे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील जे सदस्य शपथविधीला गेले होते, त्यापैकी काहींनी मला फोन केले. आम्हाला याठिकाणी (राजभवनात) बोलावण्यात आले, आमच्या सह्या घेण्यात आल्या, आमचा नाईलाज झाला. पण आमची भूमिका वेगळी आहे. आम्ही दोन-तीन दिवसांत तुम्हाला येऊन भेटतो, असे त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त इतर कोणाशीही माझं बोलणं झालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यापैकी फक्त छगन भुजबळ माझ्याशी बोलून गेले होते. रात्री सगळे लोणावळ्याला होते वाटतं. छगन भुजबळ मला म्हणाले की, जे काही होतंय ते योग्य नाही. मी तिथे जातो आणि काय होतंय ते तुम्हाला कळवतो. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मला थेट शपथ घेत असल्याचे कळवले, असे शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar: अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा शरद पवारांना फोन, म्हणाले, आम्ही सह्या केल्यात पण…

शरद पवार अजून पूर्णपणे अॅक्टिव्ह झालेले नाहीत, थोडावेळ थांबा; जितेंद्र आव्हाडांचं सूचक वक्तव्य

या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीसांना सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारले. एखाद्या पोराने म्हाताऱ्या बापाला घराबाहेर काढावं, तशी आता परिस्थिती झालीये. माणुसकी जिवंत असेल तर हृदयाला चिमटा बसत असेल ना की हे आपण काय करतोय… आपण इतके निष्ठूर… इतके संवेदना विसरलेलो झालो आहोत की आपल्याला काहीच वाटत नाही? दु:खाची एक छटाही तुमच्या तोंडावर दिसत नाही. सहा तारखेला बैठक होती ना… त्याच्याआधीच एवढी घाई…? सहा तारखेच्या बैठकीत सांगितलं असतं साहेब आम्ही असं असं करणार आहे. त्यांनी सांगितलं असतं, करा बाबा-माझं काही म्हणणं नाही. पण बैठक ठेवायला सांगून त्यांनीच असा निर्णय घेतला- यावर आता काय बोलायचं…?, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Maharashtra Politics: अजित पवारांचा शपथविधी इतक्या तडकाफडकी का झाला, मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली?

अजून शरद पवार पूर्णपणे अॅक्टिव्ह झालेले नाहीत. टेलिफोन ऑपरेटरनी फोनाफोनी करायला सुरुवात केलेली नाहीये. जरा थांबा. आव्हाड म्हणतात, जयंत पाटलांनी माझी प्रतोद म्हणून निवड केली आहे. त्यामुळे प्रतोद म्हणून मी जो व्हीप जारी करेन, तो सगळ्यांना लागू असेल. अजित पवारांनी सांगितलं प्रदेशाध्य क्षबदला. दुसऱ्या दिवशी तर बदलता येत नाही ना. जो माणूस तिथे आहे, त्यालाही विचारात घ्यावं लागतं ना, चर्चा करूनच एकत्रित निर्णय होतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

हा असला प्रकार मला नवीन नाही, शरद पवारांनी मांडली कणखर भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here