रत्नागिरी: राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. याआधीच्या बंडाला उद्धव ठाकरे जबाबदार होते तसेच आता शरद पवार जबाबदार आहेत. अजित पवारांची बदनामी करून त्यांना संपवण्याचे कारस्थान शरद पवारांनी आखले होते, महाराष्ट्रातील मोठया राजकीय भूकंपानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला विरोधी पक्षनेते पद नको असे त्यांनी सांगितले होते. शरद पवारांना मुदतही दिली होती. या सगळ्याचा राजकीय अर्थ जाणकारांना कळला होता. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे अजित पवारांबरोबर नाहीत, याचा अर्थ यामध्ये शरद पवार नक्कीच नाहीत. कारण ती दोन माणसे शरद पवार यांची आहेत. आता या सगळ्यानंतर उद्धव ठाकरे सगळं गुंडाळून परदेशात गेले नाही म्हणजे झाले, अशी बोचरी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
अजित पवारांच्या शपथविधीनंतर बारामतीत ‘थोडी खुशी थोडा गम’, कुठे आतिषबाजी तर कुठे नाराजी
राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी आज शपथ घेतली आहे. शिवसेना आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का यावर रामदास कदम म्हणाले की, लवकरच येत्या आठ दिवसात तोही शपथविधी होईल. अजित पवारांनी पहिल्यावेळी जी चूक केली ते ती आता परत करणार नाही. दोन तृतीयांश बहुमत त्यांच्याकडे असल्याशिवाय अजित पवार इतके मोठे पाऊल उचलणार नाहीत. शरद पवार कधीही कुणाचेच होणार नाहीत. राष्ट्रवादीची साथ सोडा शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसू नका, हे मी उद्धव ठाकरे यांना आमदार गुवाहटीला गेले तेव्हाच सांगत होतो. मला त्यांचा फोन आला होता, पण उद्धव ठाकरे ऐकले नाहीत. सगळ्या आमदारांना परत आणण्याची जबाबदारी मी घेतो इतके सांगूनही ते ऐकले नाहीत.

आम्ही लोकांमध्ये जाऊ, लोकांचा पाठिंबा घेऊ; पवारांनी दंड थोपटले

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांचे मंत्रीपद आणि आमदारकी काढून आपल्या मुलाला दिली. दिवाकर रावते यांच्याबाबतीतही तेच केले. शिवसेाप्रमुखांबरोबर काम केलेल्या नेत्यांना संपवण्याचे काम त्यांनी केले. तसेच पुत्रप्रेम म्हणून मुलाला वर आणायचे होते. तेच काम आता शरद पवार यांनी केले आहे. मुलीला राजकरणात पुढे आणण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांचा प्रत्येकवेळी अवमानच आणि अन्यायच केला. हे उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहात होता. म्हणून आज अजित पवारांनी या अन्यायाला वाचा फोडली, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here