मुंबई : आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच ह्या राज्य सरकारमध्ये सत्तेतील तिसरा घटक म्हणून सहभागी झालेलो आहोत. आम्ही पक्ष सोडला आहे, असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. तर असं अजिबात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला फक्त भांडण करून चालणार नाही. कुठेतरी आपल्याला सकारात्मक काम करणं गजरेचं आहे. यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
जळगाव जिल्ह्यातील विधानसभेचा NCPचा एकमेव आमदारही अजित पवारांसोबत, राजकारणात मोठी खळबळ
पंतप्रधान मोदींवर आम्ही अनेकदा टीकाही केली. पण एका बळकट हातात देशाचं नेतृत्व आहे आणि सुखरूप आहे, हे नाकारूनही चालणार नाही. देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी (पंतप्रधान मोदी ) तातडीने पावलं उचलून समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओबीसींचे अनेक प्रश्न आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि सरकारमध्ये राहून आम्हाला ओबीसींचे आणि इतर मागासवर्गीय समाजाचे प्रश्न सोडवता येणार आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.
Maharashtra Political Crisis: शरद पवारांनी दंड थोपटताच जयंत पाटलांनी निष्ठा दाखवली, म्हणाले मी साहेबांबरोबरच
पाटण्यामध्ये देशातील विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत पक्षांची एकमेकांवरची नाराजी समोर आली. म्हणून सर्व विरोधी पक्षांची एकजूट झालेली नाही. देशात २०२४ ला मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असं पवार साहेबांनीच आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं. असं जर असेल तर एक सकारात्मक विचार घेऊन त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची मदत घेतली पाहिजे आणि आपण सरकारला मदत केली पाहिजे. उगच रस्त्यावर भांडून हे प्रश्न सुटणारे नाहीत. यामुळे सत्तेत जाऊन सर्व प्रश्न सोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असं भुजबळ म्हणाले.

अजितदादा राज्याचे नवे उपमुख्यमंत्री; बारामतीत जोरदार घोषणाबाजी अन् फटाक्यांची आतषबाजी

लोक आरोप करत आहेत, यांच्यावर गुन्हे आहेत, म्हणून ते गेले. कोणावर गुन्हे आहेत? अजितदादांवरील आरोप हटवले गेले. माझ्यावरची महत्त्वाची केस आहे, ती सुटली. अनिल भाईदास पाटील, तटकरे मॅडम, धर्मराजबाबा आत्राम, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे या कुणावरही केसेस नाहीत. हसन मुश्रीफांवर खटला सुरू आहे. पण त्यांच्यावर आरोप ठेवून अद्याप कुठलीही कठोर कारवाई कोर्टाकडून झालेली नाही. कारण ठोस काही असं त्यांच्याविरोधात सापडत नाहीए. म्हणून उगिच कोणीतरी बालंट लावण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही तुमचं काम करा, असं म्हणत छगन भुजबळांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here