सातारा: आज राष्ट्रवादीचा जो गट फुटला आहे. त्याला मी ईडी गट म्हणेन. त्याच्यावर ईडीची छत्रछाया आहे. ईडीची कृपा झालेली आहे, त्या लोकांनी आपल्याला रात्री चांगली झोप यावी, यासाठी पक्षांतर केलेले आहे. राष्ट्रवादीचा गट फोडला आहे. आता त्यांना मंत्रीपद ही बहार करण्यात आली आहेत, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर त्यांची प्रतिक्रिया आली आहे.
अजित दादांची बदनामी करून त्यांना संपवण्याचे कारस्थान शरद पवारांचेच; रामदास कदमांची बोचरी टीका
ते पुढे म्हणाले, शिवसेनेमध्ये जी फूट झाली. पक्षांतर झाले. ज्यांनी बंड केले, त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १६ जणांवर खटला सुरू आहे. त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्यास नकार दिला. ते प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवले आहे. याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष यांना द्यायचा आहे. हा निर्णय १० ऑगस्ट २०२३ पर्यंत द्यावा लागणार आहे. हा निर्णय अध्यक्षांना लांबवता येणार नाही. या निर्णयात १६ जणांचे निलंबन करावे लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद रिक्त होत आहे. त्याची ही पूर्वतयारी आहे. तो निर्णय उद्या-परवा ही ते देऊ शकतात. निर्णय हा सूर्यप्रकाशाएवढा स्पष्ट आहे. किती दिवस लांबवण्याचा हा राजकीय निर्णय आहे. त्यामुळे ती पूर्वतयारी आहे.

अजित पवारांना त्यांनी घेतलेल्या भूमिकेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, मी शरद पवारांसोबतच | सुनील भुसारा

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ही आश्चर्याची गोष्ट आहे की, जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छातीठोकपणे सांगितले की, हा निर्णय अजित पवार यांच्यामुळे घेतला आहे. जो त्यांनी त्रास दिला, त्याला आम्ही कंटाळून आणि निधीच्या वाटपावरून अथवा इतर गोष्टींमुळे असेल. आता त्याच अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदी हाताखाली शिवसेनेचे आमदार काम करणार आहेत. त्यांच्या शपथविधीच्या वेळी त्यांचे चेहऱ्यावरील भाव पाहिले आपण. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील अथवा गटातील आमदार, मंत्री असतील यांच्या चेहऱ्यावरून भाव स्पष्ट दिसत होते, असे ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here