नागपूर : तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी येथे पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ऋषिकेश अनिल कराडे ( वय २१ ), राहुल अरुण मेश्राम ( वय २१ ), नितीन नारायण कुंभारे ( वय २१ ), शंतनू अरमरकर ( वय २२) आणि वैभव वैद्य, सर्व राहणार वाठोडा, अशी मृत तरुणांची नावे आहेत.
नोकरी मिळवून देण्यासाठी महिलेला भेटायला बोलावलं, मित्रा सोबत मिळून केला धक्कादायक प्रकार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाठोडा परिसरात राहणारे आठ जण रविवारी दुपारी चार आपल्या दुचाकीवरून मोहगाव झिल्पी येथे पिकनिकसाठी आले होते. सुरुवातीला काही काळ सर्व जण तलाव परिसरात फिरले आणि मोबाइलवर फोटोही काढले.
आधी पत्नीला संपवलं, मग स्वतःला, सकाळी सकाळी घडली भयंकर घटना, १३ वर्षांची लेक अनाथ झाली
संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास आठ पैकी एक तरुण तलावात उतरला. तो बुडायला लागला. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याला वाचाविण्यासाठी अन्य एक तलावात गेला. अशाप्रकारे वाचविण्यासाठी एकामागोमाग एक पाचही जण तलावात गेले आणि बुडाले. अन्य तीन मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. परिसरातील नागरिक धावले.

ग्रामीण पोलिसांच्या वायरलेस विभागात अधिकारी दारू पिऊन ड्युटीवर; पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी

एका नागरिकाने या घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अनुराग जैन, हिंगणा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here