पुणेः पुण्यात जम्बो सेंटरची गरज आहे का? असे काहीजण दबक्या आवाजात बोलत आहेत. मात्र, सध्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांपैकी सुमारे २० टक्के रुग्ण हे जिल्ह्यातील किंवा अन्य जिल्ह्यांमधील आहेत. त्यांना आरोग्यसेवा देणे आवश्यक आहे. त्यामुळे जम्बो सेंटरची गरज आहे, असं स्पष्टीकरण यांनी दिलं आहे.

मुंबईनंतर पुण्यात रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करोना रुग्णांसाठीचे जम्बो कोव्हिड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. पुण्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर ८०० खाटांचं कोव्हिड सेंटर उभारण्यात आलं आहे.

शहर व ग्रामीण भागांमधील रुग्ण शहरात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळं निश्चित येथील सेंटरचा वापर रुग्णांना होणार आहे. हे कोव्हिड सेंटर उभारण्यास उशीर झाला असला तरी चांगल्या प्रकारे काम झालं आहे, असंही अजित पवार म्हणाले. पुणेकरांची रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. एका सर्वेक्षणात ५१ टक्के पुणेकरांना करोना होऊनही गेल्याचं समोर आलं आहे. तसंच, करोनावर मात करण्यासाठी देशासह जगभरातील कंपन्या लसींवर काम करीत आहेत. असा दावाही त्यांनी केला आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारलेल्या जम्बो सेंटरमध्ये मंगळवारी सायंकाळपासून रुग्ण दाखल करण्यास सुरुवात केली जाणार आहे. सोमवारी हा परिसर निर्जंतुकीकरण केला जाणार आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं. पिंपरी-चिंचवडमधील अण्णासाहेब मगर मैदान येथे उभारण्यात येत असलेल्या जम्बो सेंटरचे उद्घाटन येत्या बुधवारी किंवा गुरुवारी केलेले जाणार आहे. बालेवाडी येथे सुमारे २५० खाटांची सुविधा असणारे सेंटर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीद्वारे उभारण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here