अहमदाबाद: गुजरातमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. राजकोट जिल्ह्यातील गोंडल येथील स्वामी नारायण गुरुकुलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या मुलाला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच वडिलांना एक फोटो पाठवला होता. गुरुपौर्णिमेला मुलगा कार्यक्रमात सादरीकरण करणार होता, त्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला ऑल द बेस्ट लिहून त्याला प्रोत्साहनही दिले होते.

मात्र, याच गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि सारेच बाहरुन गेले. कार्यक्रम मध्येच थांबवून विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीत विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.

Buldhana Accident: मोठी बहीण म्हणाली- अग झोप उद्या खूप कामं आहेत; तनिषाने नेहमीसाठीच डोळे बंद केले
गोंडलजवळील रिबडा येथील स्वामीनारायण गुरुकुल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरूंबद्दल चर्चा झाली. यादरम्यान, धोराजीच्या वेल्फेअर सोसायटीत राहणारे देवांश व्यंकुभाई भयानी (पटेल) याला हृदयविकाराचा झटका आला. दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, अखेर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासणीतच रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. जिथे प्राथमिक तपासात देवांशचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे.

१.२० मिनिटांनी बहिणीशी फोनवर बोलला, १.२२ वाजता बसला अपघात, भाऊराया गेला; चटका लावणारी कहाणी
देवांशचे वडील उद्योगपती आहेत. देवांश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुपौर्णिमेला देवांशला गुरुकुलच्या मैदानात सुमारे ५०० विद्यार्थ्यांसाठी गुरूंविषयी भाषण करायचे होते. देवांशचे भाषण सकाळी नऊ वाजता होते आणि साडेआठच्या सुमारास त्याला हृदयविकाराचा झटका आला. माहिती मिळताच पालक त्याचे राजकोटला पोहोचले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

प्रवाशाला स्टेशनवरच हार्ट अटॅक; आरपीएफ जवान देवदूतासारखे धावून आले

देवांशने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी बरीच तयारी केली होती. या कार्यक्रमापूर्वी देवांशने वडिलांना फोटो पाठवला होता आणि त्यांच्याशी संवादही केला होते. हा फोटो पाहून वडिलांनी त्याला बेस्ट ऑफ लकही म्हटलं होतं. मात्र, याच्या काहीच वेळात देवांशला हार्टअटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here