म.टा. प्रतिनिधी, नगर: ‘काँग्रेसचे नेते यांच्यासारख्या पुरोगामी नेतृत्वाची केवळ काँग्रेसला नव्हे तर देशाला गरज आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावर काँग्रेसमध्येच विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत. पक्षाचे अध्यक्षपद गांधी कुटुंबियांपेक्षा बाहेरच्या व्यक्तीला देण्यात यावे, अशीही एक सूचना पुढे आली आहे. ती करणाऱ्या देशातील काही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी व्यक्त केलेले मत महत्वाचे मानले जात आहे.

संगमनेरमध्ये बोलताना थोरात म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे. केवळ पक्षासाठी नाही तर देशालाही त्यांच्यासारख्या पुरोगामी नेतृत्वाची गरज आहे. एक समर्थ नेतृत्व, देशाला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व राहुल गांधीच देऊ शकतात. सोनिया गांधी आज पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी या काळात खूप चांगले काम केले. एक समर्थ नेतृत्व त्यांनी दिले. त्यांना पाहिजे तोपर्यंत त्या अध्यक्ष राहतील. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांनी नेतृत्व करण्यासाठी तयार रहावे, आम्ही त्यांच्या पाठीश भक्कमपणे उभे राहू.’

थोरात काँग्रसचे निष्ठावान नेते मानले जातात. पडत्या काळातही त्यांनी काँग्रेसला साथ दिली आहे. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडल्यानंतर तर थोरातांचे पक्षातील वजन आणखी वाढले. विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात प्रचाराला आलेल्या राहुल गांधी यांनी थोरात यांच्याकडे मुक्काम केला होता. थोरात यांची गांधी घराण्याशी जवळीक होतीच, या निमित्ताने ती आणखी वाढली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामध्येही थोरात यांची भूमिका महत्वाची राहिली. आता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारासंबंधी विविध मतप्रवाह सुरू असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही थोरातांच्या मताला महत्व प्राप्त होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here