अहमदाबादः करोनाचा प्रादुर्भाव पाहता मार्च महिन्यापासून राज्यातील निम्म्याहून अधिक जनतेला होमिओपॅथीक औषध आर्सेनिकम अल्बम-३० च्या गोळ्या रोगनिवारक म्हणून वाटण्यात आल्या, अशी माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने दिलीय. गुजरातमधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत राज्याच्या आरोग्य विगाभाने २० ऑगस्टला जागतिक आरोग्य संघटनेसमोर सादरीकरण केलं. राज्यातील सुमारे ३.४८ कोटी नागरिकांना आर्सेनिक अल्बम-३० च्या गोळ्यांचे वाटप केले, असं गुजरातच्या आरोग्य विभागाने सांगितलं. पण करोनावरील उपचारासाठी हे औषध उपयुक्त असल्याचं सध्यातरी कोणतेही वैज्ञानिक पुरावे आढळून आलेले नाहीत.

आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) चा वापर करणारे क्वॉरंटाइनमध्ये असलेले ९९.६ टक्के रुग्ण संसर्गापासून मुक्त झाले, असा दावा राज्य सरकारने केला आहे. राज्य सरकारने आपल्या सादरीकरणाची माहिती माध्यमांना दिली. ‘आयुष अंतर्गत सुचविलेले उपाय रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरले आहेत. आयुष उपचाराच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी एक संशोधनही केले गेले होते, असं आरोग्य विभागानं म्हटलंय.

९९ टक्क्यांहून अधिक नागरिकांना लाभ झाला!

‘आयसोलेशन कालावधीत ३३, २६८ रुग्णांना आयुष औषधांचा फायदा झाला. यातील निम्म्या नागरिकांनी होमिओपॅथीकची औषधे घेतली’, असं राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितलं. गुजरातच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव जयंती रवी यांनी रविवारी माहिती दिली. आर्सेनिकम अल्बम-३० या औषधाच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास होता. कारण ज्या रुग्णांना आर्सेनिकम अल्बम-३० गोळ्या दिल्या गेल्या त्यापैकी ९९.६९ जण लवकरच करोनामुक्त झाले, असं ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here