रत्नागिरीः रविवारी दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. करोनाच्या संकटामुळं यंदा घरच्या घरीच विसर्जन करण्याचा किंवा कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, रत्नागिरीत समुद्रकिनारी विसर्जनासाठी गेलेल्या दोघे बुडाले असल्याची घटना घडली आहे.

रविवारी संध्याकाळी बाप्पाच्या विसर्जनासाठी शहरानजिक भाट्या टाकले येथे विशाल पिलणकर (३३) व सत्यवान पिलणकर (३०) असे दोघे गेले होते. मात्र, समुद्राचा अंदाज न आल्यानं दोघं बुडाल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून दोघांचाही शोध घेण्यात येत आहे. तसंच, डीवायएसपी गणेश इंगळे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, लाडक्या बाप्पांना आज दीड दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. करोना साथीचे संकट असल्यामुळं यंदा गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळं सोशल डिस्टनसिंग आणि शांततेत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मुंबई माहापालिकासह इतर महापालिकांनीही नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे.

वाचाः

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here