याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीतील पेट्रोल संपल्याने दुचाकीस्वार अजय राठोड यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली. त्यांनी जवळचा पेट्रोल पंप गाठला. पंपावरून एका डब्यात पेट्रोल घेतलं आणि ते पेट्रोल गाडीत टाकलं. गाडीत पेट्रोल टाकताच गाडीने अचानक पेट घेतला.
गाडीने पेट घेतल्याने काही क्षणातच आग भडकली. मोठ्या प्रमाणात लागलेली आग पाहताच घाबरलेल्या अजय यांना काही सुचेना. त्यांनी पाण्याने आज विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग विझण्याऐवजी जास्तच भडकली. अखेर आगीच्या ज्वाळांनी गाडी पूर्णपणे जळून गेली. हा सगळा थरार काहींनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून आता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.