एका ट्विटमुळे त्याच सर्व होत्याचं नाहीसं झालं. त्याची वैयक्तिक संपत्ती एका दिवसात जवळपास ९४ टक्क्यांनी घसरून $९९१.५ दशलक्ष झाली. तर ब्लूमबर्गच्या मते एका दिवसात अब्जाधीशाच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसपैकी एक असलेल्या FTX चे संस्थापक सॅम बँकमन-फ्राइड यांच्या अटकेनंतर आता क्रिप्टोकरन्सीच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सॅम बँकमन-फ्राइडवर आर्थिक फसवणुकीचा आरोप असून अमेरिकेतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी घटना आहे आणि याप्रकरणी त्याच्यावर फौजदारी खटलाही सुरू आहे.
एक ट्विट अन् सॅम बँकमन-फ्राइडचा खेळ खल्लास
सॅम बँकमन-फ्राइडच्या नशिबाने यूटर्न तेव्हा घेतला जेव्हा ३० वर्षीय सॅमने क्रिप्टो एक्सचेंज FTX प्रतिस्पर्धी Binance द्वारे विकत घेतले जात आहे, असे जाहीर केले. जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म Binance चे प्रमुख चांगपेंग झाओ यांनी देखील सॅमच्या ट्विटला दुजोरा देत एका ट्विटमध्ये सांगितले की त्यांच्या कंपनीने FTX खरेदी करण्याच्या पेपर्सवर स्वाक्षरी केली आहे कारण कंपनीला छोट्या एक्सचेंजमध्ये ‘महत्त्वपूर्ण तरलता क्रंच’चा सामना करावा लागला होता.
1) Hey all: I have a few announcements to make.
Things have come full circle, and https://t.co/DWPOotRHcX’s first, and last, investors are the same: we have come to an agreement on a strategic transaction with Binance for https://t.co/DWPOotRHcX (pending DD etc.).
— SBF (@SBF_FTX) November 8, 2022
रातोरात १४.६ अब्ज डॉलर साफ
कॉईनडेस्कनुसार FTX अधिग्रहणाची बातमी येण्यापूर्वी सॅम बँकमन-फ्राइडची एकूम संपत्ती अंदाजे $१५.२ अब्ज होती आणि सॅमच्या एका ट्विटनंतर त्याच्या संपत्तीतून रातोरात जवळपास $१४.६ अब्जची घट झाली. ३० वर्षीय अब्जाधीशासाठी हा सर्वात मोठा धक्का होता, ज्याला फॉर्च्युन मॅगझिनने ऑगस्टमध्ये येत्या भविष्याचा जगातील दुसरे वॉरेन बफे म्हटले होते. FTX च्या पतनाने संपूर्ण क्रिप्टोकरन्सी व्यवसायात जणूकाही भूकंप आले. अटक होण्यापूर्वी ३० वर्षीय अब्जाधीशने एका मुलाखतीत त्याच्या अपयशाची कबुली दिली आणि स्वतःच्या चुका मान्य केल्या.
बँकमन-फ्राइडने २०१९ मध्ये FTX ची स्थापना केली आणि क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगच्या मास्टरपैकी एक बनला, परंतु नोव्हेंबरमध्ये एक्सचेंजच्या आर्थिक अहवालानंतर ग्राहकांनी अचानक पैसे काढण्यास सुरुवात केली. यानंतर FTX दिवाळखोर झाले. फ्राइडवर या एक्सचेंजमधून त्याच्या अन्य कंपनी अल्मेडाचे कर्ज फेडल्याचा गंभीर आरोप असून त्याच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. वायर फ्रॉड, मनी लाँड्रिंग आणि फसवणूक यापैकी प्रमुख आहेत.
कोण आहे सॅम बँकमन फ्राइड?
स्टॅनफोर्ड लॉ स्कूलच्या प्राध्यापकांचा मुलगा आणि उच्चभ्रू मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून पदवी घेतल्यानंतर सॅमने काम करण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये क्रिप्टोकरन्सीकडे वळण्यापूर्वी त्याने वॉल स्ट्रीटवर ब्रोकर म्हणून काम केले. सॅम एक शाकाहारी असून तो क्रिप्टो मनीचा सार्वजनिक चेहरा बनला होता. तसेच प्राणी कल्याण आणि ग्लोबल वॉर्मिंग विरुद्धचा लढा यासारख्या त्याच्या आवडत्या कारणांसाठी त्याने जवळजवळ सर्व संपत्ती दान करण्याचे वचन दिले.