बेंगळुरू: देशातील राजकीय घडामोडींचे केंद्र सध्या महाराष्ट्र ठरले आहे. अजित पवारांसह ९ जण राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू या घडामोडीवर संपूर्ण देशातील विरोध पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात आता महाराष्ट्रातील शेजारच्या राज्यातून एक मोठी अपडेट समोर येत आहे.

कर्नाटकात देखील महाराष्ट्राप्रमाणे परिस्थिती निर्माण होत आहे, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेता एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. २०१९ मध्ये कोणी विचार केला नव्हता की माझे सरकार पडेल. महाराष्ट्रात देखील असेच झाले. महाराष्ट्रात झालेल्या धक्कादायक घडामोडीनंतर ते म्हणाले, मला भीती वाटते की कर्नाटकातील अजित पवार कोण असेल. कर्नाटकमध्ये अशी गोष्ट (महाराष्ट्रा प्रमाणे) होण्यास वेळ लागणार नाही. एका वर्षाच्या आत काँग्रेस सरकार पडेल. मी हे नाही सांगणार की अजित पवार कोण आहे. मात्र ही गोष्ट लवकरच होईल.
कुमारस्वामी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस पक्षाच्या भूमिकेमुळे देशात महाआघाडी तयार होत नाहीय. २०१८ साली आघाडी करून आम्ही काय मिळवले. दुसऱ्या बाजूला भाजपने विधानसभेत जोरदार गदारोळ केला.

आज जी मतं ऐकली, ते ऐकल्यावर समजलं कार्यकर्ते नाराज का होते; शरद पवारांची सूचक विधान कोणासाठी
कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार ही दोन नावे होती. डीके शिवकुमार यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे होते. पण काँग्रेस श्रेष्ठींच्या समोर त्यांचे काही चालले नाही. नंतर त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या शिवाय अनेक मुख्यमंत्री आहेत असे देखील कुमारस्वामी म्हणाले.

OPINION: वाजपेयी जी, आज तुमची फार आठवण येतेय; म्हणाले होते, अशा प्रकारे मिळणाऱ्या सत्तेला…
महाराष्ट्रात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या बाजूने प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नाराजी कुणावरच नाही, पण प्रफुल पटेल-सुनील तटकरेवर शरद पवारांचा निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here