मुंबई: जेव्हापासून शास्त्रज्ञांनी अंतराळाबाबत अध्ययन करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून ते एलियन्सविषयी अभ्यास करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ एलियन्सचा शोध घेत आहेत. तसेच, जगात वेगवेगळ्या ठिकाणी एलियन्स दिसल्याच्या घटना घडल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, आजवर त्याबाबत कुठलाही ठोस पुरावा सापडलेला नव्हता. पण, नुकताच शास्त्रज्ञांनी एलियन्सच्या ग्रहाचा शोध लावला आहे.

एलियन कुठे राहतात याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला. ते ज्या ग्रहावर राहतात त्याचा आकार युरेनस ग्रहाइतका मोठा असू शकतो. हा ग्रह आपल्या सौरमालेच्या शेवटच्या टोकाला आहे, असे म्हटले जात आहे. हा ग्रह पृथ्वीपासून अनेक ट्रिलियन मैल दूर आहे. एलियन्सचा हा ग्रह लोकांच्या नजरेपासून दूर आहे. तो अद्याप कोणालाही सापडलेला नाही. मात्र, आता त्याचा शोध अधिक वेगाने करण्यात आला आहे. या ग्रहाची माहिती होताच एलियन्सचे रहस्यही उलगडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Buldhana Accident: मोठी बहीण म्हणाली- अग झोप उद्या खूप कामं आहेत; तनिषाने नेहमीसाठीच डोळे बंद केले
नासाने दिलेल्या माहितीनुसार, एलियन्सचं हे लपलेलं जग उर्ट क्लाउडच्या मागे लपलेलं आहे. हे सूर्यापासून शेकडो ट्रिलियन मैलांच्या अंतरावर आहे. आजपर्यंत एवढ्या अंतरावर कोणत्याही ग्रहाचा शोध लागला नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याच्या आत एलियन्स राहत असल्याची शक्यता आहे. ज्या ग्रहाबद्दल बोलले जात आहे त्याला अनाथ असेही म्हटले जात आहे. कारण, या ग्रहाबाबत कोणालाही कुठलीही माहिती नाही. नासाच्या दाव्यानंतर आता या ग्रहाबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.

तरुणीवरील हल्ल्याने पुणे सुन्न! बचावास गेलेले अनेक जण जखमी; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

तज्ज्ञांच्या मते या एलियन्सचे जग पृथ्वीपासून खूप दूर आहे. या ग्रहावर आयुष्य असेल अशी शक्यता सात टक्के असल्याचं मानले जात आहे. इतक्या अंतरावर अनेक प्रकारचे तारे देखील असतात. आजपर्यंत कोणीही एलियन्सबद्दल स्पष्ट माहिती देऊ शकलेले नाही. अनेकदा असे पुरावे समोर येतात, ज्यामध्ये कधी एलियन तर कधी यूएफओ दिसल्याचं सांगितलं जातं, परंतु या पुराव्यांवर कोणीही विश्वास ठेवत नाही. अमेरिकेचा ५१ हा भाग एलियन्सचा गड मानला जातो. मात्र, याबाबत स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here