नववर्षातील पहिले आज, शुक्रवारी होणार असून ते संपूर्ण देशातून पाहता येणार आहे. चंद्रावर पृथ्वीची उपछाया पडणार असल्याने हे चंद्रग्रहण ‘पेनुंब्रल’ या प्रकारचे आहे. त्यामुळे खग्रास चंद्रग्रहणात चंद्रबिंब लाल-तपकिरी दिसते, तसे या चंद्रग्रहणात दिसणार नाही. चंद्र पृथ्वीच्या उपछायेने झाकोळला गेल्यासारखा दिसेल. भारताप्रमाणेच हे चंद्रग्रहण आशिया, आप्रिका व ऑस्ट्रेलिया येथूनही दिसू शकेल.
आज, पौष पौर्णिमेला रात्री १०.३७ वाजता चंद्रग्रहणाला सुरुवात होईल आणि ते शनिवारी, ११ तारखेला पहाटे २.४२ वाजता संपेल, असे येथील एम. पी. बिर्ला प्लॅनेटेरिअमचे संचालक देविप्रसाद दुआरी यांनी सांगितले आहे. वर्षभरात होणाऱ्या चार ‘पेनुंब्रल’ चंद्रग्रहणांपैकी हे पहिले चंद्रग्रहण आहे. यानंतर ५ जून, ५ जुलै व ३० नोव्हेंबर या दिवशी अशी पृथ्वीच्या उपछायेने पेनुंब्रल चंद्रग्रहणे दिसतील.
वर्षभरात एकूण सहा ग्रहणे
२०२० या वर्षात एकूण सहा ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी चार चंद्रग्रहणे असून दोन सूर्यग्रहणे आहेत. यापैकी तीन ग्रहणे भारतातून दिसू शकतील, अशी माहिती उज्जैन येथील जिवाजी वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्रप्रकाश गुप्त यांनी दिली. ते म्हणाले, २१ जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार असून ते भारतातून दिसणार आहे. १४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार असून ते भारतातून दिसणार नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times