सोलापूर: माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा, अन्य कोणी परवानगीशिवाय फोटो वापरू नये, अस शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. हे आदेश शरद पवारांनी राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना दिले आहे. शरद पवारांच्या आदेशाला सोलापुरात मात्र केराची टोपली दाखवत अजित पवार समर्थकांनी सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अजित पवार आणि शरद पवारांचे मोठे पोस्टर लावले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले- आमचे प्राधान्य…
नूतन उपमुख्यमंत्री यांचे हार्दिक अभिनंदन, अशी बॅनरबाजी जुबेर बागवान यांनी केली आहे. या पोस्टर्समुळे सोलापुरातील शरद पवार गट आणि अजित पवार गट आमनेसामने येऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. जुबेर बागवान हे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवक जिल्हाध्यक्ष या पदावर होते. अजित पवारांचे समर्थन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीमधून युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांनी जुबेर बागवान यांना पदावरून दूर केल्याचा पत्र सोमवारी सायंकाळी जाहीर केले होते. मंगळवारी सायंकाळी जुबेर बागवान यांनी मार्केट यार्डासमोर शरद पवार अजित पवारांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लावले आहे.

जुबेर बागवान यांनी आमचे नेते अजित पवार यांच्या सूचनेनुसारच शरद पवार साहेबांचा आम्ही फोटो वापरला आहे असे स्पष्ट केले आहे. शरद पवार आणि अजित पवार अशी उभी फूट राष्ट्रवादी मध्ये पडली आहे. अजित पवारांनी राज्य सरकारमध्ये सामील होताच रविवारी सायंकाळी सोलापुरात संतोष पवार, उमेश पाटील, जुबेर बागवान यांनी अजित पवारांचा समर्थन करत जल्लोष साजरा केला होता. अजित पवारांचा समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली.उमेश पाटील, जुबेर बागवान, अमीर शेख, तन्वीर गुलजार, संतोष पवार यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दिल्लीतही पवारांविरोधात राजकारण, पण संकटात पृथ्वीराज चव्हाण धावून आले

मंगळवारी सायंकाळी जुबेर बागवान यांनी मार्केट यार्डासमोर शरद पवार आणि अजित पवारांचे एकत्रित बॅनर लावून अजित पवारांचे अभिनंदनाचे बॅनर लावले. एकीकडे शरद पवार यांनी स्पष्ट केले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने पक्षातून हकालपट्टी केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी सोलापूरच्या मार्केट कमिटीसमोर नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा बॅनर लावला आहे. त्यावर शरद पवार यांचा फोटो वापरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here