राज्यातील परमीटराज संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना आदेश दिले आहेत. राज्याबाहेर आणि अंतर्गत प्रवासी वाहतूक, वस्तूंची ने-आण व अन्य स्वरूपाच्या वाहतुकीवरील निर्बंध हटविण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. यामुळे येत्या बुधवारी मुंबईत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याप्रश्नी विचारविनिमय होऊन निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाउनचे बहुतांश निर्णय मागे घेऊन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न होतील असे दिसते.
राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीवर २३ मार्चपासून निर्बंध होते. याचा आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने जिल्हा, आंतरराज्यीय वाहतुकीवरची सर्व बंधने उठवण्याचे निर्देश शनिवारी सर्व राज्यांना दिले होते. २३ मार्चपासून बंद असलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक २० ऑगस्टला सुरू झाली. मात्र खासगी वाहनांना जिल्ह्याबाहेर जाण्यास ई-पासची अट लागू आहे. मुंबईत येत्या बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यात ई-पासचे नियम शिथिल होण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले.
मुंबईची लाइफलाइन असलेली उपनगरी लोकलसेवा सध्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. तथापि इतरांना उपनगरी लोकलसेवा खुली केल्यास करोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी प्रशासनाला भीती वाटते. त्यामुळे उपनगरी लोकल सेवेच्या फेऱ्या वाढवून तसेच प्रवाशांची संख्या मर्यादित ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारचा विचार चालू आहे. बुधवारी मंत्रिमंडळात राज्यातील लॉकडाऊन संपुष्टात आणण्यावर चर्चा होईल. मात्र निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबर म्हणजे गणेश विसर्जनानंतर होईल. या उत्सवात होणारी गर्दी टाळण्याचा यामागे उद्देश असल्याचे कळते.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतरराज्यीय व राज्यातंर्गत वाहतुकीवरील निर्बंध हटविण्याच्या संदर्भातील पत्राची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून खासगी वाहनांवरील ई-पाससक्ती हटवण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी सूतोवाच केले. सध्या मुंबईसह राज्यात सरकारी आणि खासगी कार्यालयात १० टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतात. त्याची मर्यादा ५० टक्के करण्यात येणार आहे. तसेच व्यायामशाळांवरची बंदी मागे घेण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागरिकांच्या नाराजीमुळे निर्णय
राज्यातील चित्रपटगृहे, शाळा, रेस्टॉरंट, सार्वजनिक उद्याने, धार्मिक स्थळे बंद आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा व आंतरराष्ट्रीय विमानसेवा अंशत: सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय इतक्यात होण्याची शक्यता नाही. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पासची सक्ती केल्यामुळे राज्यात नागरिकांमध्ये मोठी नाराजी होती. राज्य आणि केंद्राकडे त्यासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानंतर खासगी वाहनांवरील ई-पाससक्ती उठवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
These are actually great ideas in concerning blogging.
A big thank you for your article.
Like!! Thank you for publishing this awesome article.