म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे आणि आता अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ आहे’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी लगावला. ‘त्या पक्षाने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. ते मला बाजूला हो म्हणत नाही. तोपर्यंत बाजूला करण्याचा कुणाला अधिकार नाही’, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

‘शरद पवार आमच्यासोबत आहेत आणि आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत, असे सांगून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ती महाराष्ट्राला समजली आहे. राष्ट्रवादीचे ५३ आमदार आमच्याकडे आहेत. त्यापैकी नऊ जणांवर आम्ही कारवाई केली आहे. त्यामुळे ५३ वजा नऊ याचा अर्थ ४४ आमदार माझ्या राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना वेगळ्या गटात टाकू नये, त्यांना वेगळी प्रलोभने दाखवू नये, त्यांच्यावर दबाव टाकू नये, सगळ्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू द्यावे’ असे आवाहन पाटील यांनी केले.

पुतण्याचे वार, नातू झाला ढाल; राष्ट्रवादीच्या पडझडीतून रोहित पवार घेणार फिनिक्स भरारी?

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या कारणांनी सोडली तीच कारणे परत आमच्या पुढ्यात आणून ठेवत आहेत. त्यामुळे असंतोष हळूहळू पुढे येईल. थोड्याच दिवसांत नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर व इतर काही जिल्ह्यांत शरद पवार स्वतः दौरा करणार आहेत. दिल्लीत कार्यकारी समितीची बैठक झाल्यानंतर हा दौरा सुरू होईल. पाऊस असो अथवा नसो पवार बाहेर पडणार आहेत. सातारच्या दौऱ्यावर जसे स्वागत झाले त्याचपद्धतीने राज्यातील जनता, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचे स्वागत करतील’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Sharad Pawar : शरद पवारांची पहिली मोहीम ठरली, भुजबळांसह त्या आमदारांची कोंडी करणार, असा असणार महाराष्ट्र दौरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here