म. टा. वृत्तसेवा, धुळे : पळासनेर (ता. शिरपूर) गावात मुंबई-आग्रा महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कंटेनरने कार, पाच दुचाकी आणि दोन मालवाहू वाहनांना जोरदार धडक देत एका हॉटेलमध्ये शिरण्याबरोबरच बस थांब्यावर जाऊन धडकला. या भीषण दुर्घटनेत ट्रकखाली चिरडून दहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

गंभीर जखमींना धुळ्यातील हिरे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. कंटेनरखाली दबले गेल्याने मृतदेहांची ओळख पटविणेही अवघड झाले होते. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत नऊ मृतदेहांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. उर्वरित एकाचे धुळे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाइकांकडे मृतदेह सोपविण्यात आला. दरम्यान, महामार्गावर खडीचा मोठा थर साचल्याने काहीकाळ मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

कुटुंबासोबतचा प्रवास ठरला अखेरचा! घरी परतताना काळाचा घाला; धुळ्यातील त्या अपघातात लेकांसमोर आईने श्वास सोडला
रोजीरोटीचे साधनच हिरावले

सिन्नर (जि. नाशिक) येथील सागर बोडके हा तरुण एका सहकाऱ्यासोबत आपल्या मालवाहू महिंद्रा पिकअपमधून दररोज नाशिक येथून भाजीपाला भरून इंदूर येथील भाजीमार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात होता. नेहमीप्रमाणे तो सोमवारी रात्री नाशिकहून इंदूरला जाण्यासाठी निघाला. भाजीपाला विक्री केल्यानंतर परतीच्या प्रवासात पळासनेर येथे हॉटेलवर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून ते हॉटेलमध्ये नाश्ता करीत होते. अचानक कंटेनरने इतर वाहनांसोबत पिकअपलाही जोरदार धडक दिली. यामध्ये पिकअपचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे पोट भरण्याचे साधनच हिरावले आहे. आता नेमकी भरपाई कशी मिळेल, आमचे वाहन सुरळीत कोण करून देईल, असा प्रश्न सागर उपस्थित करीत होता.

या वाहनांचे झाले नुकसान

कंटेनर (आरजे ०९ जीबी ९००१)ने वाहनांना दिली धडक. एमएच १८ बीएस ७६९२ हीरो होंडा मोटारसायकल, एमपी ११ एमच १६३५ हीरो होंडा डीलक्स मोटारसायकल, एमपी ४६ एमएफ ४२२१ हीरो होंडा स्प्लेंडर, एमएच १५ एएच १०७० मालवाहू पिकअप, एमएच ३९ आर ४६८७ हीरो होंडा डीलक्स मोटारसायकल, एमपी ११ टीआर बीजे ४३३२ नवीन स्कूल बस, नंबर नसलेली हीरो होंडा स्प्लेंडर, एमएच १८ बीआर ५०७५ ह्युंदाई कार

Dhule Accident: चालकाचा ताबा सुटला, आठ वाहनांना धडक; असा झाला धुळ्यातील थरारक अपघात, Video

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here