टायर बनवणारी आघाडीची भारतीय मल्टिनॅशनल कंपनी CEAT लिमिटेडच्या स्टॉकने गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घ मुदतीत जोरदार नफा दिला आहे. एवढेच नाही तर CEAT स्टॉकने गेल्या वर्षभरातही जोरदार मुसंडी मारली असून या वर्षी स्टॉक आतापर्यंत शेअर १२० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक धोकादायक असली तरी मोठ्या प्रमाणात परतावा देखील मिळवू शकतो. अनुभवी ट्रेडर्सना छोट्या-मुदतीवर चांगला परतावा मिळू शकतो, तर वैयक्तिक हौशी लोकही शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक अफाट संपत्ती जमा करू शकतात.
CEAT लिमिटेड शेअरची वाटचाल
CEAT लिमिटेडच्या स्टॉक दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देत एक मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आला आहे. २०२३ मध्ये वर्ष-दर-वर्ष CEAT स्टॉक जवळपास २८% वाढला असून दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. २० वर्षापूर्वी ४ जुलै २०२३ रोजी शेअरची किंमत ३९.७८ होती जी ४ जुलै २०२३ रोजी २०४२ रुपये इतकी वाढली आहे. म्हणजे २० वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने स्टॉकमध्ये गुंतवलेले फक्त १०,००० रुपये आता जवळपास ५.१३ लाख रुपये झाले असेल, जो की ५०००% हून अधिक मोठा फायदा आहे.
CEAT लिमीटेड शेअरमध्ये गुंतवणूक करावी का?
संस्थात्मक गुंतवणूकदार CEAT स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याचे अपेक्षित असून टू-व्हीलर सेगमेंटमध्ये ही कंपनी २८% शेअरसह बाजारात आघाडीवर आहे. तर प्रवासी वाहनांमध्ये १५% आणि व्यावसायिक वाहनांमध्ये ७% वाटा आहे. दरम्यान, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने CEAT वर दोन हजार ३७५ रुपये प्रति शेअरच्या लक्ष्य किंमतीसह ‘बाय’ रेटिंग कायम ठेवली आहे. म्हणजे स्टॉकमध्ये सुमारे १५ टक्के वाढीचा संभाव्य अंदाज आहे.