भोपाळ: मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात एकानं केल्याची घटना घडली आहे. तरुणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रवेश शुक्ला असं आरोपीचं नाव आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.आरोपी प्रवेश शुक्लाला अटक करण्यात आल्याची माहिती सिधी जिल्ह्याच्या एएसपी अंजू लता पटेल यांनी दिली. ‘या प्रकरणात लवकरच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आरोपी शुक्ला विरोधात बहारी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम २९४, ५०४ आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार निवारण अधिनियमाच्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे,’ असं पटेल यांनी सांगितलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक व्यक्ती जमिनीवर बसलेला दिसत आहे. त्याच्या जवळ उभा असलेला व्यक्ती त्याच्यावर लघुशंका करत आहे. जमिनीवर बसलेला व्यक्ती अतिशय घाबरलेला दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर दहशत स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेत वेगानं चक्रं फिरवली आणि आरोपीला अटक केली. आरोपी प्रवेश शुक्लाविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवेश शुक्ला भारतीय युवा मोर्चाचा उपाध्यक्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. तो भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र शुक्ला यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे.
Home Maharashtra संतापजनक! आदिवासी मजुरावर लघुशंका, VIDEO समोर येताच पोलिसांची कारवाई; आरोपीचं भाजप कनेक्शन