नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत हॉटेल प्राईडच्या स्विमिंग टँकमध्ये बुडून फॅब्रिकेशन व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. मृत सुशांत मधुसूदन धोपटे (५१) हा घरच्या लेआउटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांच्याच दोन मुलांदेखत घडली.फॅब्रिकेशन व्यावसायिक धोपटे हे १२ वर्षांचा मुलगा शौर्य आणि १२ वर्षांची मुलगी शगुन यांच्यासोबत हॉटेल प्राईडमध्ये दोन महिन्यांपासून स्विमिंग शिकत होते. सकाळी ९ वाजता पोहण्याचा क्लास संपल्यानंतर प्रशिक्षक कपडे बदलण्यासाठी गेले. धोपटे, त्यांची मुलगी शगुन आणि एक डॉक्टर त्यावेळी टाकीत होते.

सुशांत धोपटे मनिषनगर मेंघरे ले-आऊट येथील रहिवासी होते. सुशांत धोपटे हे मागील दोन महिन्यांपासून आपला मुलगा शौर्य (१२) आणि मुलगी शगुण (१७) यांच्यासोबत हॉटेल प्राईडच्या या जलतरण तलावावर पोहण्यासाठी येत होते. टाकीच्या एका टोकाला शगुन आणि डॉक्टर पोहायला लागले आणि धोपटे दुसऱ्या टोकाला पोहत होते. सुशांत पोहत असतानाच त्यांना चक्कर आली,आणि धोपटे यांचा अचानक पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या टोकाला असल्याने शगुन आणि डॉक्टरांना याबाबात काही कळलंच नाही. जेव्हा प्रशिक्षक कपडे बदलून परत आला तेव्हा त्याने शगुनला सुशांत धोपटे बद्दल विचारले, ज्यावर शगुनने सांगितले की तो येथे पोहत आहे. प्रशिक्षकने स्विमिंग पुलच्या आत डोकावले असता धोपटे हे स्विमिंग पुलमध्ये बुडालेले दिसले.
Maharashtra Cabinet: अजित पवारांना पुन्हा अर्थखाते, दिलीप वळसे-पाटील, अदिती तटकरेंना मोठी लॉटरी लागणार?
त्याने उडी मारून सुशांत धोपटला टाकीतून बाहेर काढले आणि खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरने त्यांना तपासले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सोनेगावचे एएसआय दोडके घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
Maharashtra Cabinet: अजित पवारांना पुन्हा अर्थखाते, दिलीप वळसे-पाटील, अदिती तटकरेंना मोठी लॉटरी लागणार?
धोपटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर सुशांत यांच्या मृत्यूने धोपटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोहताना वडिलाचा मृत्यू झाल्याने शौर्य व शगून हे दोघे जबर मानसिक धक्क्यात आहेत. नातेवाइक धाय मोकलून रडत आहेत. शौर्य व शगुनची कशी समजूत घालावी, असा मोठा प्रश्न नातेवाइकांसमोर उपस्थित झाला आहे.

अजितदादांसोबत गेलेला आणखी एक मोहरा शरद पवारांकडे परतला, म्हणाला, प्रतिज्ञापत्रावर आमच्या सह्या पण….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here