मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. मुंबईतील वरळी सी फेसवर या अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. एका गोणीत हा मृतदेह आढळून आला आहे.

अजितदादांसोबत गेलेला आणखी एक मोहरा शरद पवारांकडे परतला, म्हणाला, प्रतिज्ञापत्रावर आमच्या सह्या पण….
धक्कादायक बाब म्हणजे, हातपाय तुटलेल्या अवस्थेत या तरुणीचा मृतदेह गोणीत आढळला आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणीचं वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तरुणीची हत्या करुन पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर एका विकृत नराधमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संबंधित तरुणीला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. ही तरुणी बेलापूर येथे परीक्षा देण्यासाठी चालली होती. त्यासाठी या तरुणीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन लोकल ट्रेन पकडली होती. यावेळी चालत्या ट्रेनमध्ये नवाझ करीम (वय ४०) याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलिसांनी या प्रसंगानंतर अवघ्या आठ तासांमध्ये नवाझ करीम याला शोधून काढत त्याला अटक केली. त्याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवारांची ‘घड्याळा’ला नव्याने चावी, माजी मंत्र्यांच्या मुलांसह चार वारसदार मैदानात उतरवणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here