मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकावणाऱ्या अजित पवार यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अजित पवार गटाकडून वांद्रे येथील एमआयटी संस्थेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. एमईटीमध्ये येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे. आजच्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार उपस्थित राहणार, यावर अजित पवार यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. अजित पवार यांना विधानसभेतील ४२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे त्यांच्या गोटातून सांगितले जात आहे. मात्र, यापैकी किती आमदार आजच्या बैठकीला उपस्थित राहणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, आज सकाळपासून वांद्रे येथील एमईटी महाविद्यालयात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ठाण मांडून बसले आहेत. अजित पवार गटाकडून दावा केल्याप्रमाणे याठिकाणी ४२ आमदार उपस्थित राहण्याची शक्यता होती. त्यासाठी व्यासपीठावर ४० ते ४५ खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र, काहीवेळाने व्यासपीठावरील खुर्च्यांची संख्या कमी करण्यात आली. त्यामुळे अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला कमी आमदार येणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एमईटी महाविद्यालयात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३० आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. उर्वरित आमदारांना दगाफटका टाळण्यासाठी एकत्रच याठिकाणी आणले जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता एमईटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार पोहोचणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, हडपसर येथील राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे तटस्थ राहणार आहेत. ते अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाच्याही बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.

बंडानंतर अजित पवारांच्या साथीला; आता शरद पवारांचा फोटो WhatsApp डीपीला; आमदार फिरला

तर दुसरीकडे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येही शरद पवार यांच्याकडून बोलवण्यात आलेल्या बैठीकीची तयारी सुरु आहे. दुपारी एक वाजता ही बैठक सुरु होणार असल्याची माहिती आहे. आज सकाळपासून यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे साधारण ७ आमदार पोहोचल्याची चर्चा आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला गेलेल्या आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आणखी किती आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचणार, हे पाहावे लागेल.

पवारांची ‘घड्याळा’ला नव्याने चावी, माजी मंत्र्यांच्या मुलांसह चार वारसदार मैदानात उतरवणार

अजित पवार एमईटीमध्ये पोहोचले, पण व्यासपीठावर चढले नाहीत कारण…

अजित पवार हे काहीवेळापूर्वीच वांद्रे येथील एमईटी महाविद्यालयात दाखल झाले आहेत. अजित पवार आल्यानंतर याठिकाणी लगेचच कार्यक्रम सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार अजूनही व्यासपीठावर गेलेले नाहीत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे नेते सातत्याने फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसत आहेत. शेवटच्या क्षणी अजित पवार कोणाला फोनाफोनी करत असावेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here