सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसीमधील सीतारुपम टेक्सटाईल कारखान्याला आज बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. अक्कलकोट एमआयडीसीमधील सीतारुपम असे टेक्सटाईल कारखान्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त, अग्निशमन दलाचे अधिकारी हे घटनास्थळी उपस्थित असून पंचनामा सुरू आहे.

सीतारुपम या टेक्सटाईल कारखान्यात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. सुतांचे बंडल, टॉवेल असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. कारखान्यातच साखर झोपेत असलेल्या कामगारांना काही कळण्याअगोदरच आग संपूर्ण कारखान्यात पसरली होती. कारखान्यात काही कामगार हे राहावयास आहेत. त्या ठिकाणी असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जवळपास ८ गाड्या पाण्याचा फवारा करत आग आटोक्यात आणली आहे. साखर झोपेत असलेल्या तीन कामगारांना झोपेतच मृत्यूने कवटाळून घेतले आहे.

अजितदादांसोबत गेलेला आणखी एक मोहरा शरद पवारांकडे परतला, म्हणाला, प्रतिज्ञापत्रावर आमच्या सह्या पण….
या घटनेमध्ये मनोज देहुरी, आनंद बगदी, सोहादेव बगदी या तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी केदार आवटे यांनी माहिती देताना सांगितले की, पहाटेच्या सुमारास जवळपास पाच कामगार हे गॅसवर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. दोन कामगार आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते, तेव्हाच आगीचा भडका उडाला. दोन कामगार स्वतःचा जीव वाचवत बाहेर पळाले. पण तीन कामगारांना बाहेर पडता आले नाही.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले आहेत. शासकीय रुग्णालयात रुग्णसेवक म्हणून काम करणारे जहांगीर शेख यांनी तिन्ही मृतदेहांना शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले आहे. एमआयडीसी पोलिसांना याबाबत अधिक माहिती विचारली असता, मृत कामगारांची ओळख केली जात आहे, अशी महिती दिली आहे.

पवारांची ‘घड्याळा’ला नव्याने चावी, माजी मंत्र्यांच्या मुलांसह चार वारसदार मैदानात उतरवणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here