पुणे : पुणे जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. त्यात जुन्नर तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. पाऊस सुरू झाल्याने या भागात डोंगर दऱ्यातील धबधबे वाहू लागले आहेत. जुन्नर तालुक्यात पर्यटनासाठी अनेक लोक वर्षा विहारासाठी येत असतात. या भागातील अनेक क्षेत्र हे वन विभागाच्या हद्दीत असल्याने वन विभागाकडून आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पावसाळी पर्यटनाचा बळी! तलावात पोहण्यासाठी मारलेली उडी ठरली अखेरची, तरुणाचा दुर्दैवी अंत
मात्र जुन्नर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मुरमाड तालुक्यातील थितबी येथील काळू नदीवरील हा सर्व प्रकार आहे. पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याचा हा बॉर्डरचा हा भाग असून काळू नदीवरील हा व्हिडिओ आहे. रविवारी तिथे आलेल्या पर्यटकांनी कोणतीही सुरक्षेची यंत्रणा उपलब्ध नसताना धबधबा ओलांडला. तिथे जाणाऱ्या पर्यटकांना गावकरी नेहमी विरोध करतात, पण पर्यटक ऐकत नाहीत. यातील बहुतांश भाग वनविभागाचा आहे. मात्र तिथे सुरक्षेसाठी कोणीही उपस्थित नसते, त्यामुळे चांगले फोटो आणि चांगले रील स्टोरी मिळवण्यासाठी अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून हा धबधबा ओलांडतात.

अनेकदा लेकरं शाळेत जाताना पाण्यात पडली, मरता मरता वाचली; रस्ता नसल्यानं थर्माकॉलवरून शाळेपर्यंत जीवघेणा प्रवास

यात दोघांना वाहून जाताना वाचवले असले तरी वन विभागाकडून कोणतीही सुरक्षा इथे ठेवण्यात आलेली नाही. सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. जीव धोक्यात घालून नदीचा प्रवाह दोरीच्या सहाय्याने पार करण्याचा प्रयत्न करतात. यात दोघांचा जीव जाता जाता वाचला आहे. त्यामुळे याठिकाणी उपाययोजना होणे गरजेचे आहे. नाहीतर पर्यटकांना नाहक आपला जीव गमावावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here