शिमला: देशात करोनाचा कहर सुरू असून आरोग्याची कमालीची काळजी घेतली जात असताना शिमल्याच्या (Shimla) इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या () कँटीनमध्ये मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे सर्वसामान्यांबरोबरोच डॉक्टरांच्या () आरोग्याशी देखील खेळ खेळला जात आहे. येथील कँटीनमधील खाद्य पदार्थांचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. शनिवारी तर कहरच झाला. या कँटीनमध्ये समोश्यात चक्क साबणाची वडीच सापडली. इतकेच नाही, तर काही दिवसांपूर्वी याच कँटीनमध्ये खाद्य पदार्थात झुरळ (Cockroach) देखील सापडले होते.

साबणापूर्वी सापडले होते झुरळ

शिमल्याच्या आयजीएमसीच्या कँटीनमध्ये काही डॉक्टर्स गरमगरम खाण्यासाठी आले होते. खाता खाता त्यांना समोश्यात साबणासारखी चव लागली. त्यानंतर डॉक्टरांनी समोसा उघडून पाहिला. पाहतात तर काय…. समोश्याक चक्क साबण होता. डॉक्टरांनी या प्रकारची तक्रार आयजीएमसीच्या मेडिकल सुपरिंटेंडेन्टकडे (MS) केली. अशा प्रकारची ही पहिली घटना नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत आणि प्रत्येक वेळी तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. या पूर्वी या कँटीनमध्ये खाद्यपदार्थात झुरळ सापडले होते. चहामध्ये देखील अशा प्रकारची घाण पूर्वी आढळली आहे.

डॉक्टरांची कारवाईची मागणी

आम्ही १५-१५ तास ड्यूटी करतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशात आम्हाला कँटीनमध्ये खावेच लागते. संपूर्ण कॉलेजमध्ये एकच आहे. मात्र येथील खाणे चांगले नसते. म्हणूनच कँटीन संचालकाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
ही कँटीन खासगी संचालक चालवत असून डॉक्टरांबरोबरच रुग्ण देखील येथे खात असतात. या कँटीनमधील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, मात्र प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान या प्रकरणावर कँटीनच्या संचालकाने माफी मागितली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here