नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने दावा केला आहे की तिच्या पतीला पॉर्नचे व्यसन आहे आणि तो तिला अनैसर्गिक सेक्स करण्यास भाग पाडतो. महिलेने सांगितले की, पती तिच्यावरही पॉर्न पाहण्यासाठी दबाव आणतो. पीडित पत्नीने पतीवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेने दिल्ली पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.

एका अधिकाऱ्याने बुधवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सोमवारी पूर्व रोहताश नगरमध्ये राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेने शाहदरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, पती पत्नीला अश्लील चित्रपटात काम करणाऱ्यांसारखे कपडे घालण्यास भाग पाडत असे. या दोघांचे २०२० मध्ये लग्न झाले होते.

उपचाराऐवजी नर्सने रुग्णासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, काहीच वेळात हार्ट अटॅकने मृत्यू
पोलिस उपायुक्त (शाहदरा) रोहित मीना यांनी सांगितले की, ‘मंगळवारी, महिलेच्या तक्रारीवरून, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८A (एखाद्या महिलेचा पती किंवा पतीच्या नातेवाईकाचा तिच्यावर अत्याचार करणे), ४०६ (गुन्हेगारी उल्लंघन), ३७७ (अनैसर्गिक गुन्हा) आणि ३४ (सामान्य हेतूने कृत्य करणे) आणि हुंडा प्रतिबंध कायद्याच्या तरतुदींनुसार शाहदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उपायुक्त मीना यांनी सांगितले की, तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. पुढील कारवाईसाठी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. तसेच डिजिटल आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here