मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात सोमवारी वाढ केली. सलग पाचव्या दिवशी देशात पेट्रोल १३ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सुरु असली तरी दुसरीकडे कंपन्यांनी डिझेल दरात मात्र कोणताही बदल केलेला नाही. २३ दिवसांपासून डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

सध्या गणेशोत्सव सुरु असून याच काळात पेट्रोल महागल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुरुवारपासून आजपर्यंत पाच दिवसांत पेट्रोल प्रती लीटर १.१९ रुपयांनी महागले आहे. या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव ८८.२८ रुपये झाला असून डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोल आज १३ पैशांनी महागले आणि पेट्रोलचा भाव ८१.३५ रुपये असून डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.६४ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८३.१३ रुपये आहे. तर डिझेल ७७.०६ रुपये प्रती लीटर आहे.

गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी शेवटच्या आठवड्यात सलग चार दिवस पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ केली होती. तर त्याआधी सलग १० दिवस डिझेल दरात वाढ केली होती. यामुळे डिझेल १.६० रुपयांनी महागले होते. अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेची घडी आता पूर्वपदावर येत आहे. इंधन मागणी देखील वाढत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला चाट बसली होती. या दरवाढीने दिल्लीत डिझेलचा भाव पेट्रोलच्या पुढे गेला. डिझेल सार्वकालीन उच्चांकावर गेलं होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थानिक कराच्या बोजाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव भरमसाठ वाढले आहेत. यावर विविध माध्यमातून टीका झाली. त्यानंतर ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला.

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४२ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे. डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती ४५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहेत. कोव्हिड-१९ केसमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे अमेरिकेत क्रूड ऑइलच्या आउटलुकवर साशंकता निर्माण झाली. कोव्हिड-१९ चा प्रभाव वाढण्याच्या शक्यतांदरम्यान अमेरिकेच्या नव्या स्टिम्युलस डीलमुळे कच्च्या तेलाच्या मागणीची शक्यता अजूनही दबावाखाली आहे. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अमेरिकी बाजारात क्रूड ऑइल इन्व्हेंट्री पातळीचा अंदाज (३ दशलक्ष बॅरल) २०२० च्या अखेरच्या आठवड्यात वाढून ७.४ दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here