मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री ८.०४ ची टिटवाळा जाणारी लोकल मुंब्रा स्थानकातील फलाट क्रमांक एकला धडकल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. यामुळे सुमारे २५ मिनिटे धीम्या मार्गावरील एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. लोकल रवाना केल्यानंतर पावणे दहाच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

सीएसएमटीहून निघालेली लोकल सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा स्थानकात पोहोचली. फलाटावर प्रवेश करताच लोकलचा पहिला डबा फलाटाला धडकला. मोटारमनने तातडीने लोकल थांबवली.बाथरुमधून मुलगी प्रियकरासोबत बाहेर आली, उलट्या करु लागली, तिकडे प्रियकरही… नांदेड हादरलं
लोकल घसरल्याने हा प्रकार झाल्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त होत असली तरी लोकल घसरलेली नाही. चौकशी अंती याचे नेमके कारण स्पष्ट होईल. लोकल गार्डने संपूर्ण तपासणी केल्यानंतर पावणे दहा वाजण्याच्या सुमारास लोकल रवाना करण्यात आली. लोकल कल्याणपर्यंत चालवून कल्याण ते टिटवाळा दरम्यान लोकल रद्द करण्यात आली. कळवा यार्डमध्ये लोकल तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी स्पष्ट केले आहे.

अंबरनाथ यार्डात लोकलप्रवेश रोखल्याने प्रवाशांनी गोंधळ घातला; रेल्वे स्थानकात थेट रेल रोको केला

मुंब्रा स्थानकातून रिकामी रवाना झाल्याने त्यामागे धावणाऱ्या कल्याण एसी लोकलमध्ये प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे एसी लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली. मुंब्रा स्थानकात २५ मिनिटे लोकल खोळंबल्याने त्यामागे धावणाऱ्या कल्याण, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली लोकल रखडल्या होत्या. धीम्या मार्गावरील लोकल विलंबाने धावत असल्याची उद्घोषणा सर्व रेल्वे स्थानकावर करण्यात येत होती.
अखेर एलियन्सच्या घराचा पत्ता सापडला, ‘या’ ग्रहावर आहे वास्तव्य, शास्त्रज्ञांच्या हाती मोठी माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here