वृत्तसंस्था, नवी दिल्ली : गेले पाच महिने घरून काम करण्याची पद्धत स्वीकारल्यामुळे ऑफिसला लागणारे करणे अथवा हे फर्निचर भाड्याने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. घरात बसून काम करताना ऑफिसप्रमाणे बैठकव्यवस्था असावी, यासाठी ऑफिससारखे फर्निचर घरी भाडेतत्त्वावर घेण्याचे प्रमाण, विशेषकरून शहरांतून वाढले आहे.

यासंदर्भात फॅब्रेन्टो फर्निचर तयार करणाऱ्या कंपनीचे संस्थापक सिद्धांत लांबा यांनी सांगितले, मार्च महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून देशात असलेल्या लॉकडाउनमुळे घरून काम करणे अनिवार्य झाले आहे. मात्र त्याचवेळी अनेक घरांतून ऑफिससाठी योग्य बैठकव्यवस्था नसणे व त्यातून आरोग्याच्या तक्रारी सुरू होणे असे प्रकार घडत आहेत. हे टाळण्यासाठी ऑफिस फर्निचरची मागमी वाढते आहे. ऑफिसचे काम करण्यासाठी डेस्कची मागमी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे लांबा यांनी सांगितले.

डेस्कच्या खालोखाल बसण्यासाठी योग्य खुर्चीची मागणीदेखील सध्याच्या काळात वाढली आहे. मात्र आधुनिक सुखसोयींनी युक्त असे हे सगळे फर्निचर खरेदी करणे सर्वांनाच परवडणारे नाही. यातून सुवर्णममध्य काढत हे फर्निचर भाड्याने मागवले जात आहे. अशा तऱ्हेने फर्निचर भाड्याने मागवणे हे कर्मचाऱ्यांना तसेट त्यांच्या कंपन्यांनाही सोयीचे जात आहे.

यासंदर्भात नाइटफ्रॅन्कनेही एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार ७० टक्के कंपन्या पुढील सहा महिने तरी घरून काम करण्याची पद्धत सुरू ठेवतील, असा अंदाज आहे. लॉकडाउन काळात घरून काम करण्यास सांगूनही कंपन्यांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला नसल्यामुळे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास प्रोत्साहित करतील, असे बाकित नाइट फ्रॅन्कने वर्तवले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here