मिंस्क: बेलारूसमध्ये सरकारविरोधात लाखोंच्या जनसमुदायाने आंदोलन सुरू केले आहे. विरोधकांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून लाखो लोक स्वतंत्र्य चौकात एकत्र आले आहे. तर, दुसरीकडे जनतेच्या या विरोधानंतर बेलारूसचे राष्ट्रपती लुकाशेन्को हे बुलेटपूफ्र जॅकेट घालून रायफलसह राष्ट्रपती भवनाच्या परिसरात उभे असल्याचे दिसून आहे.

बेलारूसमध्ये ९ ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या निवडणुकीतही लुकाशेन्को यांनी गैरमार्गाने विजय मिळवला असल्याचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास दीड लाख नागरिकांनी लुकाशेन्को यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. एवढ्या मोठ्या आंदोलनाची कल्पनाही अनेकांनी केली नव्हती. आंदोलकांवर अंकुश लावण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी लष्कराला तैनात करण्यात आले आले.

वाचा:

या दरम्यान राष्ट्रपती लुकाशेन्को असॉल्ट रायफलसह राष्ट्रपती भवनात दिसून आले. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते हेलिकॉप्टरमधून उतरत आहेत. राष्ट्रपती भवनजवळ मोठ्या संख्येने लोक एकत्र जमा झाले आहेत. तर, आतापर्यंत सात हजार आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

वाचा:

अटक करण्यात आलेल्या आंदोलकांचा पोलीस छळ करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या आणि निवडणुकीवर देखरेख ठेवणाऱ्या एका पर्यवेक्षकाने सांगितले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय पाहता लुकाशेन्को यांना ८० टक्के मतदान झाले असेल अशी शक्यता कमीच वाटते. त्यांनी जर्मन वृत्तवाहिनी डीडब्लूसोबत बोलताना सांगितले की, निवडणुकीचे निकाल संशयास्पद आहे. राष्ट्रपती पुन्हा विजयी झालेत असे मुळीच वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा:
आंदोलनामागे पाश्चिमात्य देशांचा हात

राष्ट्रपती लुकाशेन्को यांच्याविरोधातील आंदोलनाला पाश्चिमात्य देशांची फूस असल्याचा आरोप करण्यात येत आहे. लुकाशेन्को यांना इतरही काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. काही दिवसांआधी सरकारच्या समर्थनात एक मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये जवळपास ७० हजारजण सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. बेलारुसमध्ये बदल हवा असल्यास आपण तो करण्यास तयार आहोत. मात्र, पुन्हा निवडणुका होणार नसल्याचेही लुकाशेन्को यांनी काही दिवस आधीच जाहीर केले होते. पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्याने आंदोलन करणे म्हणजे बेलारूसचे स्वत:चे अस्तित्व गमावण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले. युक्रेनमध्ये पाश्चिमात्य देशांनी ज्याप्रकारे हस्तक्षेप केला तसाच प्रकार बेलारूसमध्ये सुरू असल्याचा आरोप लुकाशेन्को समर्थकांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here