म. टा. प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर आणखी ५२ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. दिवा-चिपळूण आणि मुंबई-मंगळुरू मार्गावर या विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. यामुळे उत्सवकाळात धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या २०८ वर पोहोचली आहे.

दिवा-चिपळूण मेमूच्या ३६ फेऱ्या:
गाडी क्रमांक ०११५५ मेमू दिवा स्थानकातून रोज सायंकाळी ७.४५ ला सुटेल आणि चिपळूणला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १.२५ वाजता पोहोचेल. ०११५६ परतीचा प्रवास दुपारी एक वाजता सुरू होणार असून दिवा स्थानकात ती सायंकाळी नऊ वाजता पोहोचेल. १३ ते १९ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान गाडी धावणार आहे. ही गाडी आठ डब्यांची असणार आहे.

त्याला पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी असे थांबे असतील.

कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनच्या उद्धघाटनासाठी जय्यत तयारी

मुंबई-मंगळुरू विशेष एक्स्प्रेसच्या १६ फेऱ्या:

०११६५ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४० वाजता मंगळुरू येथे पोहोचेल. ०११६६ परतीचा प्रवास सायंकाळी ६.४० ला सुटणार असून दुपारी १.३५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल. ही २० डब्यांची गाडी असणार आहे.

या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर असे थांबे असतील.

Monsoon 2023 : पुण्यासह राज्यात दोन दिवस पावसाचे, कुठं मध्यम तर कुठं मुसळधार पाऊस, जाणून घ्या अपडेट

३ जुलैपासून आरक्षण:

विशेष गाड्यांसाठी ३ जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आरक्षण खुले झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here