मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळख असलेले अजित पवार हे शिवसेना-भाजपसोबत राज्यातील सत्तेत सहभागी झाल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मुंबई बाजार समितीवर पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र आताच्या झालेल्या राजकीय नाट्यानंतर बाजार समितीमध्येही खळबळ उडाली आहे.

बाजार समितीमध्ये शरद पवारांना मानणारा एक वर्ग आहे. त्याच प्रमाणे अजित पवारांच्या विचारांशी सहमत असणाऱ्यांचीही संख्या बऱ्यापैकी आहे. त्यामुळे काहींची कुणासोबत जावे, अशी द्विधा मनस्थिती झाली आहे. मात्र त्यातल्या त्यातही शरद पवार यांच्याकडे बाजार समिती घटकांचा कल अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील बाजार समित्यांवर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यात मुंबई बाजार समिती ही सर्व बाजार समित्यांची शिखर समिती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या बाजार समितीवर शरद पवारांचे नेहमीच विशेष लक्ष राहिले आहे. या बाजार समितीमधील घटकांसाठी शरद पवार हे नेहमीच एकमेव पर्याय राहिले आहेत. पवारांनाही याची जाणीव असल्याने तेही बाजारातील व्यापाऱ्यांनी आमंत्रण दिल्यावर येथील कार्यक्रमांना आवर्जून हजर राहिले आहेत.

मार्च महिन्यातच मसाला बाजारातील बेदाणा लिलाव केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. पवार या कार्यक्रमाला येतील की नाही, याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. मात्र, पवारांनी जातीने, वेळेवर हजेरी लावून व्यापाऱ्यांचा विश्वास सार्थ करून दाखवला. व्यापारी, कामगार हा घटक आपल्यासोबत आहे, याची त्यांनाही जाणीव आहे.

शेतकऱ्याच्या हाती ड्रोन आला; पीक फवारणीची प्रात्याक्षिके, ८ मिनिटांत एक एकरावर औषध फवारणी

शरद पवार कृषी मंत्री असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि पर्यायाने बाजारातील कृषी व्यापाऱ्यांसाठी अनेक धोरणात्मक, फायदेशीर निर्णय घेण्यात आले होते. बाजारातही किंवा व्यापारात काही अडचणी असल्यास व्यापारी त्या सोडवण्यासाठी पवारांकडे धाव घेतात. याचा फायदा निवडणुकीतीही झाला आहे. मुंबईतील निवडणूक असो किंवा गावाकडील निवडणूक, मत राष्ट्रवादीच्या नेत्याला हे समीकरण ठरलेले होते आणि ते आताही कायम आहे. त्यामुळे या मोठ्या मतदारवर्गाला सांभाळण्यासाठी त्यांच्या सर्वच कार्यक्रमांना पवारांनी हजेरी लावली आहे. मग तो एखाद्या संस्थेचा कार्यक्रम असो किंवा माथाडी मेळावा. पवार हे आवर्जून या कार्यक्रमांना उपस्थित राहातात.

बाजार घटकांचे नेते कुठेही गेले तरी बाजार घटक मात्र पवारांसाठी कायम तयार राहिला आहे. त्यामुळे अजित पवार पक्षातून बाहेर गेले असले तरी त्यांना मानणारा वर्गही शरद पवारांसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजार घटकांची शरद पवार या नावावरती असलेली निष्ठा सध्या तरी कायम असल्याचे दिसत आहे. तर, बाजार समिती घटकांमधील तरुणांना राजकारणात फारसा रस नाही. ‘आपले काम करून देणारा आपला नेता’ ही त्यांची भूमिका आहे. तरीही काही प्रमाणात तरुणांचा कल अजित पवारांकडे असल्याचे दिसत आहे. मात्र यावर कुणीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही.

कोकणवासियांसाठी गुड न्यूज ; गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, आता धावणार इतक्या गाड्या

शरद पवार आम्हा सर्वांच्या मनात आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग बाजार समितीमध्येच आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, काहींची द्विधा मनस्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वजण पुढे काय होणार, याकडे लक्ष लावून बसले आहेत, अशी प्रतिक्रिया फळ बाजाराचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.

शरद पवारांना, त्यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग नवी मुंबईत आहे. तो त्यांच्या सोबतच आहे. अजित पवारांच्या पक्षातून जाण्याने फारसा काही फरक पडणार नाही. मात्र सत्तेत गेल्याने अजित पवारांच्या प्रशासकीय कामकाजाच्या अनुभवाचा, त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा, निर्णय घेण्याच्या क्षमतेचा राज्यातील जनतेला फायदा होईल, अशी आशा आहे. असे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विक्रम शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनो त्वरा करा; या योजनेसाठी उरला थोडाच कालावधी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here