इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार करोनाकाळात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली. त्यामुळे तेल कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. नजीकच्या भविष्यात हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज बांधून अरामकोने चीनबरोबरील करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जगभरात करोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. करोनावर अद्याप लस दृष्टिक्षेपात नसल्याने साथीवर नियंत्रण मिळवणेही अवघड दिसत आहे. या परिस्थितीचा औद्योगिक जगतावरही विपरित परिणाम होत आहे. या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अरामकोतर्फे नकार देण्यात आला आहे. या करारातील प्रमुख चिनी भागीदार चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन आणि पन्जीन सिन्सेन यांच्यातर्फेही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अरामकोकडे रोख तरलतेचा अभाव
जगभरातील तेल कंपन्यांची अवस्था जवळपास एकसारखीच आहे. घटलेली मागणी आणि घसरणारे तेलाचे दर यांमुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर अरामकोने भांडवली खर्च घटविण्यावर भर दिला आहे. याशिवाय कंपनीने ७५ अब्ज डॉलरचे रोखे जारी करण्याचा निर्णयही घेतला आहे. हे रोखे मोठ्या प्रमाणावर प्रामुख्याने सौदी अरबमध्ये जारी करण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी झाला होता करार
सौदी अरब आणि चीन यांच्यातील रिफायनरी आणि पेट्रोकॉम्प्लेक्सची निर्मिती करण्याचा करार फेब्रुवारी २०१९मध्ये झाला होता. खुद्द क्राउन प्रिन्स सलमान यांनी करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराच्या माध्यमातून आशियाई बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्याचा अरामकोचा प्रयत्न होता. या कराराच्या माध्यमातून नजीकच्या भविष्यात चीनतर्फे मोठ्या प्रमाणावर सौदी अरबमध्ये गुंतवणूक करण्यात येणार होती. मात्र, आता जगभरातील करोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरब आणि चीन यांच्यातील कराराला ब्रेक लागला आहे.
भारतात ४४ अब्ज डॉलर गुंतवणार
सौदी अरामकोने चीनसोबतचा १० अब्ज डॉलरचा करार रद्द केल्यानंतर सर्वांची नजर आता भारताशी करण्यात येणाऱ्या ४४ अब्ज डॉलरच्या कराराकडे लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मेगा रिफायनरी प्रकल्पात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची सातत्याने घसरणारी किंमत आणि घटती मागणी यांचा विचार करता अरामको या प्रकल्पातूनही गुंतवणूक मागे घेणार अथवा नाही, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
These are actually great ideas in concerning blogging.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.