ओक्साका : मेक्सिकोतील दक्षिणेकडील राज्यातील ओक्साकामध्ये बुधवारी एक बस पर्वतीय भागातून प्रवास करत असताना दरीत कोसळली. या अपघातात जवळपास २९ जणांचा मृत्यू झाला आहे. २१ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरीत कोसळल्यानं बस दुर्घटनाग्रस्त झाली होती. अपघाताची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. या घटनेतील जखमींना उपचारांसाठी विविध रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

ओक्साकामधील अधिकारी बर्नाडो रॉड्रिग्ज यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार २९ जणांचा मृत्यू झाला होता. तर, १७ जणांना वैद्यकीय मदत देऊन विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आलं. आम्ही अपघाताच्या कारणांचा शोध घेत असल्याचं बर्नाडो रॉड्रिग्ज म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळं अपघात झाला.

चालकाचं नियंत्रण सुटलं अन्..

नागरी सुरक्षा यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार जखमींना ज्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी ६ लोक बेशुद्ध होते. त्यांची स्थिती गंभीर होती. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की स्थानिक परिवहन विभागाकडून चालवण्यात यणारी बस मंगळावीर रात्री मेक्सिकोमधून निघाली होती. तर, सैंटियागो डी योसोंडुआ शहराकडे निघाली होती.

Pune Koyta Gang: जिथे दहशत माजवली, तिथेच पोलिसांनी जिरवली; पुण्यातील डॅनी गँगची धिंड; Video
जीसस रोमेरो या अधिकारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडल्याचं म्हटलं. ही बस २५ मीटर खोल दरीत कोसळली आणि २९ जणांचा मृत्यू झाला, असं म्हटलं. जीसस रोमेरो यांनी जखमी प्रवाशांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. आपत्कालीन सेवा देणाऱ्या यंत्रणांनी घटनास्थळावरुन मृतदेह ताब्यात घेतले. ही घटना मैग्डालेना पेनास्कोमध्ये घडली. हे शहर पर्वतीय भागात आहे. या भागातील रस्ते वळणावळणाचे आहेत, त्यामुळं अपघाताची शक्यता अधिक असते.
राष्ट्रवादीमुळे अस्वस्थता, शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंची माफी मागून घरवापसीच्या तयारीत? राऊतांचा दावा
ओक्साका राज्याचे गव्हर्नर सॉलोमन जारा यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून शोक व्यक्त केला. या अपघतात बसचा वरचा भाग नष्ट झाला. स्थानिक परिवहन सेवा देणाऱ्या कंपनीकडून या बसेस चालवल्या जातात.
जरंडेश्वर कारखाना कवडीमोल दरानं.., ईडीच्या चार्जशीटवरुन न्यायालयाचं अजित पवारांच्या निकटवर्तींयांकडे बोट

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here