हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये असलेल्या राजीव गांधी विमानतळावर सोने तस्करीची चक्रावून टाकणारी घडली आहे. एक प्रवासी अंडरवेअरमध्ये ३३१ ग्रॅम सोनं लपवून विमानतळावर उतरला. त्याच्यावर कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी त्याला रंगेहात पकडलं. त्याच्याकडे असणारं सोनं जप्त करण्यात आलं आहे. प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. प्रवाशाकडे सापडलेल्या सोन्याची किंमत जवळपास २० लाख रुपयांच्या घरात जाते.प्रवाशानं ३३१ ग्रॅम अंडरवेअरमध्ये लपवली होती. तो शारजाहहून येत होता. कस्टमच्या अधिकाऱ्यांना त्याच्याबद्दल संशय वाटला. त्यामुळे त्याची झडती घेण्यात आली. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात अधिकारी अंडरवेअरमध्ये लपवण्यात आलेली सोन्याची पेस्ट बाहेर काढताना दिसत आहेत. तस्करीचा हा मार्ग पाहून अधिकारी अवाक् झाले. गेल्या महिन्यात असाच काहीसा प्रकार केरळमध्ये घडला होता. एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईटनं दोन प्रवासी केरळच्या पालक्कडला पोहोचले. त्यांना कस्टम विभागानं अटक केली. अब्दुल रौफ आणि सक्कीर अशी दोघांची नावं होती. अब्दुलकडे ५५८ ग्रॅम आणि सक्कीरकडे ५७० ग्रॅम सोनं सापडलं. आरोपींनी सोनं पोस्टच्या स्वरुपात आणलं होतं. त्यांनी सोन्याची पेस्ट अंडरवेअरमध्ये लपवून आणली होती. सोने तस्करीच्या अजब घटना याआधीही समोर आल्या आहेत. एप्रिल २०२३ मध्ये सीमा सुरक्षा दलानं एका महिलेला २.१४५ किलो सोन्यासह अटक केली. महिलेनं सोन्याचे विविध आकारांचे २७ बार कपड्यात गुंडाळून कमरेला बांधले होते. महिलेकडे १ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचं सोनं सापडलं. या तस्करीसाठी महिलेला २ हजार रुपये मिळणार होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here