नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा (Sonia Gandhi) यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ( meet) आपले हंगामी अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण केवळ एका वर्षासाठी पक्षाचे हंगामी अध्यक्ष बनलो असून गेल्या १० ऑगस्ट या दिवशी हा कार्यकाल पूर्ण झाला आहे. हे पाहता आणि पक्षाने योग्य त्या व्यक्तीची या पदासाठी निवड करावी असे सोनिया गांधी यांनी बैठकीत म्हटले आहे. आज सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यकारिणीची नियोजित बैठक सुरू झाली. सुरुवातीलाच पक्षाध्यक्ष या नात्याने सोनिया गांधी यांनी उपस्थित नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. या नंतर आता हंगामी पक्षाध्यक्ष पदासाठी कोणाची निवड करावी, हा मुद्दा काँग्रेस कार्यकारिणीपुढे आहे. ( has expressed her desire to step down as the interim president of the congress)

सध्या काँग्रेसला पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदासाठीच नव्या नेत्याची निवड करावी लागणार आहे. करोनाचे संकट दूर झाल्यानंतर योग्य प्रक्रियेनुसार काँग्रेसला पक्षाचा पूर्णवेळ अध्यक्ष निवडावा लागणार आहे. दरम्यान, पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदासाठी डॉ. मनमोहन सिंह, ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी, मल्लिकार्जुन खरगे आणी मीराकुमार यांची नावे चर्चे आहेत.

‘गांधी कुटुंबाबाहेरील असावा अध्यक्ष’

दरम्यान, काँग्रेस पक्षाचा पुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाच्या बाहेरचा असावा अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे. हीच भूमिका काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील घेतलेली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वेगवेगळी मते आहेत. काँग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांना सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांपैकी एका नेत्याने पक्षाध्यक्षपदी कायम राहावे असे वाटते. तर युवकांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी यावे असे वाटते. तशा प्रकारची पत्रे देखील काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना धाडलेली आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, राहुल गांधी यांना थेट अध्यक्ष बनवण्याची जोखीम काँग्रेस पक्ष सध्या घेईल असे वाटत नसल्याचे स्पष्ट होत आहे. सोनिया गांधी यांचा राजीनामा मंजूर झाल्यास माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, ए. के. अँटनी, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे किंवा मग मीराकुमार यांच्या पैकी एका नेत्याला पक्षाचा अंतरिम अध्यक्ष बनवण्यात येऊ शकते, असे मानले जात आहे. त्यानंतर करोनाचे संकट दूर झाल्यानंतर रितसरपणे पुन्हा राहुल गांधी यांची पक्षाध्यक्ष पदावर नियुक्ती करेल अशी दाट शक्यता आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here