काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाला द्यावे या वरून काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि युवा नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली भूमिका कळवली आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांनी सध्याच्या काळात पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोडू नये असे बैठकीत अनेक नेत्यांनी सांगितले. यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचा समावेश आहे.
दरम्यान, सोनिया गांधी या केवळ एका वर्षासाठी हंगामी अध्यक्षा बनल्या होत्या. त्यांचा एका वर्षाचा कार्यकाल गेल्या १० ऑगस्टला पूर्ण झाला. मात्र, त्यानंतर पक्षातील नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा ऐरणीवर आला. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये गुलाम नबी आजाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, AICC आणि CWC चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद यांचा समावेश आहे.
तसेच माजी मुख्यमंत्र्यांमध्ये भूपिंदरसिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, एम. वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी और मिलिंद देवडा या नेत्यांचाही यात समावेश आहे. काँग्रेसचे नेते राज बब्बर, अरविंदरसिंह लवली आणि कौल सिंह यांनी या पत्राचे समर्थन केले आहे. अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित यांच्या देखील सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रामध्ये सह्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
काँग्रेसमध्ये दोन गट
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी गांधी कुटुंबाबाहेरील नेता अध्यक्ष व्हावा अशी भूमिका घेतली असली तरी, गांधी कुटुंबातील नेत्यानेच पक्षाचे अध्यक्ष व्हावे असे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटते. थेट लोकांमध्ये जाऊन काम करेल अशा अध्यक्षाची काँग्रेस पक्षाला आज गरज आहे. नवा काँग्रेसअध्यक्ष मुख्यालयासह प्रदेश काँग्रेस समित्यांच्या मुख्यालयांमध्ये देखील उपलब्ध असला पाहिजे, असे मत नेत्यांनी व्यक्त केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.