बिहाराच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील घडामोडींचा वापर केला जाणार हे, आता स्पष्ट झाले आहे. भाजपकडून सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुद्दा यासाठीच पेटविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्याला शह देण्यासाठी आता राष्ट्रवादीकडून रोजगाराचा मुद्दा आणि विकासाच्या दृष्टाकोनातून बिहारची महाराष्ट्राची तुलना केली जात असल्याचे दिसून येत आहे.
वाचा:
लॉकडाउनच्या काळात बिहारला गेलेले स्थलांतरित कामगार आता पुन्हा महाराष्ट्रात परतू लागल्याकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यांनी बिहारी युवकांना साद घातली आहे. ते म्हणतात, गावी परतल्यानंतर निराशाच वाट्याला आल्याने या मजुरांनी पुन्हा महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याची वाट धरल्याचे दिसून येत आहे. बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विकास हा नावापुरताही कुठं दिसला नाही. सरकारने विकासाचं राजकारण करण्याऐवजी केवळ लोकांची दिशाभूल करण्याचंच काम केलं. ‘आधीच्या सरकारने केले नाही म्हणून आमच्याकडं हॉस्पिटल नाहीत’, असं एक वक्तव्य कोविड-१९ च्या काळात बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केल्याचं मी वर्तमानपत्रात वाचलं. एक सत्ताधारी मंत्री असं बोलतोय हाच एक मोठा विनोद आहे आणि अशा राजकीय वक्तव्यातूनच त्यांची विकासाची ‘दृष्टी’ दिसून येते, असे सांगत पवार यांनी युवकांना साद घातली आहे.
वाचा:
ते म्हणातात, बिहारी लोक खासकरून युवक हे कष्टाळू आणि चिवट आहेत. त्यांच्यात हुशारीही आहे, पण तरीही विकास का होत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात युवा शक्तीची ताकद करपून जातेय. म्हणून माझं बिहारच्या युवांनाही आवाहन आहे की ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनीच आता स्वतःहून पुढं यावं. तुमचा भविष्यकाळ तुम्हीच बदलू शकता, पण तुम्हीही फक्त पहात बसलात तर काही नेत्यांच्या फक्त सत्तेच्या राजकारणात तुमच्या उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न कधी साकार होईल, हे कोणताही भविष्यकार सांगू शकणार नाही.
पवार यांनी बिहारी राजकारण्यांवर टीका केली आहे. राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी करायचं असतं, पण बिहारमधील राजकारणी मंडळी कशाचं राजकारण करतात हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. पण त्यांच्या या राजकारणामुळं जनता मात्र आहे त्या ठिकाणीच राहिलीय. लोकांच्या प्रगतीत तसूभरही वाढ झाली नसल्याचं दिसतं. दुसरा मुद्दा म्हणजे एखाद्या दुर्दैवी घटनेचंही राजकारण कसं करावं हे बिहारमधील नेत्यांनाच जमतं. अशा घटनेतही ते आपला हात धुवून घेतात. पण करोनाच्या काळात बिहारमधील स्थलांतरीत कामगारांची महाराष्ट्राने कशी काळजी घेतली याच्या अनेक बातम्या, व्हिडिओ आपण पाहिले आणि हेच लोक बिहारमध्ये गेल्यानंतर त्यांचे कसे हाल झाले हेही पाहिलं, तरीही हेच लोक याबाबत मात्र काही बोलत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं.
महाराष्ट्रातील नेत्यांना टोला
रोहित पवार पुढे म्हणतात, बिहारमध्ये विकास झाला नाही, कामधंदा नाही, उद्योगधंदे नाहीत, म्हणून आम्हाला महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात जाण्याची वेळ आल्याचं बिहारमधील अनेक लोक मला सांगतात. गेल्या काही दिवसांपासून मी बिहारमधील नेत्यांचं राजकारण पाहतोय पण ते काही विकासाच्या दिशेने सुरू आहे, असं वाटत नाही. एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यासाठी त्यांच्याकडून जी ताकद खर्च होते, त्यातील काही टक्के जरी ताकद आणि वेळ विकासावर खर्च केला असता तर आज बिहारमधील युवांना उवजीविकेसाठी महाराष्ट्रासारख्या अन्य राज्यात जावं लागलं नसतं. तसंच विकसित भारताचं स्वप्नही साकार झालं असतं. विकसित भारत म्हणजे केवळ महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, पंजाब अशा मोजक्याच राज्यांचा विकास नसतो, तर प्रत्येक राज्याने त्यात आपलं योगदान देणं गरजेचं आहे. स्पर्धा ही विकासाची व्हायला हवी. पण महाराष्ट्रासारखी काही राज्ये विकासाचे नवनवीन प्रकल्प राबवत असताना बिहार मात्र त्यापासून कोसो मैल लांब आहे. तिथल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत वर्तमानपत्रात अनेक रकानेच्या रकाने भरुन बातम्या मी वाचल्या आणि इथलेच राजकारणी इतर राज्यातील पोलीस यंत्रणेबाबत जेव्हा बोलतात तेव्हा हसू येतं, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I really like and appreciate your blog post.
A big thank you for your article.
Like!! Thank you for publishing this awesome article.