पिंपरी: कामाच्या ठिकाणी असलेल्या मुलीसोबत पतीचे प्रेमसंबंध असल्याने पत्नीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना सोमवारी (३ जुलै) मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली. निर्गुण भोलानाथ तिखंडे (वय २६, रा. वराळे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय मृत महिलेच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सासरी नांदत असताना तिचा पती निर्गुणचे त्याच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. निर्गुण फिर्यादी यांच्या मुलीला माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी सारखा तगादा लावत असे. त्यावरून फिर्यादी यांच्या मुलीचा मानसिक व शारीरिक छळ करीत असे. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने सोमवारी राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अखेर एलियन्सच्या घराचा पत्ता सापडला, ‘या’ ग्रहावर आहे वास्तव्य, शास्त्रज्ञांच्या हाती मोठी माहिती
नवविवाहितेची आत्महत्या

दुसरीकडे, लग्नाला अवघा दीड महिना झाला असताना नव्या नवरीने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक कारणांवरून छळ होत असल्याने तिने हे पाऊल उचलले असल्याबाबत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (३ जुलै) घडली. कौशल पिराजी भोसले (रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत नवविवाहितेच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस ऍक्शन मोडवर ! जिथे दहशतीसाठी वाहने फोडली, तिथूनच पोलिसांनी आरोपींची धिंड काढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here