म. टा. प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा टोळीने कट रचला होता. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तो उधळून लावला. कटातील पाच जणांना अटक करून सात पिस्तुले आणि २१ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.

आवारे यांची १२ मे रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात भरदिवसा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत असतानाच हत्येचा बदला घेण्याचा कट एका टोळीने रचला. दरोडाविरोधी पथकातील पोलिस अंमलदार आशिष बनकर आणि सुमीत देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद सोपान सांडभोर (वय ३३, रा. तळेगाव दाभाडे), शरद मुरलीधर साळवी (वय ३०, रा. काळेवाडी. मूळ रा. जालना) यांना २५ जूनला मध्यरात्री सव्वा वाजता तळेगाव दाभाडे एसटी स्टँड परिसरातून कारसह पोलिसांनी ताब्यात घेतले.

Rain Update: जळगावात जोर’धार’! मुसळधार पावसाचा धुमाकूळ, काही ठिकाणी अतिवृष्टी, नद्यांना पूर
या दोघांकडून चार गावठी पिस्तुले, १४ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास दरोडाविरोधी पथक करीत होते. तपासादरम्यान पोलिसांनी अमित जयप्रकाश परदेशी (वय ३१, रा. तळेगाव दाभाडे), मंगेश भीमराव मोरे (वय ३०, रा. वडगाव मावळ) आणि अनिल वसंत पवार (वय ३९, रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक केली. या आरोपींनी साथीदार अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी (वय २८, रा. तळेगाव दाभाडे), देवराज (रा. जळगाव जामोद, बुलढाणा) यांच्यासह आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट केला.

सर्व आरोपी पोलिस रेकॉर्डवरील

अटक केलेले आणि त्यांचे दोन साथीदार आरोपी पोलिस रेकॉर्डवरील आहेत. त्यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, नगर, तळेगाव दाभाडे, कामशेत, कोपरगाव, चाकण, वडगाव पोलिस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमवून गाड्यांची तोडफोड करून जाळपोळ करणे, बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणे असे २६ गुन्हे दाखल आहेत.

Nashik Rain: नाशकात पावसाचा येलो अलर्ट, तर इतरपुरी-त्र्यंबकेश्वरमधून पाऊस गायब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here