महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली. त्यानंतर २०२४ ची मावळ लोकसभा निवडणुक मुख्यमंत्री शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे की उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार लढणार? याबाबत चर्चा मतदारसंघात रंगली आहे. २०१९ साली पार्थ पवारांना ज्यांच्यामुळं पराभव चाखावा लागला, त्या श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादी आमच्या महायुतीत असली तरी २०२४ लोकसभा निवडणुकीत मीच उमेदवार असणार,असं म्हणत आत्ताच दावा ठोकला आहे. त्यामुळं पार्थ पवारांचं काय होणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
शिंदे – फडणवीस सरकारमधील मावळ लोकसभेचा उमेदवार मीच असा दावाच श्रीरंग बारणे यांनी केला आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असून त्याच्यामध्ये कोणातही बदल होईल असे वाटत नसून आपणच मावळ लोकसभेचा उमेदवार असल्याचा दावा बारणे यांनी केला आहे. पार्थ पवार यांना अजित पवार निवडणुकीसाठी कुठून उमेदवारी देतात हे अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी मावळ लोकसभेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.