नवी दिल्ली : सोन्याची खरेदी आपल्या सर्वांचीच पसंतीची आहे. घरात लग्नसाईचा कार्यक्रम असो किंवा कोणताही सण-उत्सव, आपण भारतीय लोक आवर्जून सोने खरेदी करतो. याशिवाय अलीकडे मौल्यवान सोन्यात स्वस्ताईचा धमाका झाल्यामुळे ग्राहकांना खरेदी सुवर्ण संधीच मिळाली आहे. गेल्या काही दिवसांतील वाढीनंतर आता सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. देशांतर्गत वायदे बाजारात सोने-चांदीच्या दरात घट झाली असून सराफा बाजारात मात्र आजही दर स्थिर आहेत.

Retirement Planning: रोज वाचवा फक्त ४४२ रुपये अन् करोडपती व्हा, पेन्शन ही मिळणार, वाचा कसं?
सोने-चांदीचा आजचा भाव काय
देशांतर्गत वायदे बाजारात सोने-चांदीच्या दरात चढउतार सुरूच आहे. सकाळच्या सत्रात सोने-चांदी घसरणीसह उघडले. सोन्याची प्रति १० ग्रॅम किंमत घसरून ५८ हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. MCX वर सोन्याचा ऑगस्ट वायदा गुरुवारच्या ५८,४०१ रुपयांच्या बंदच्या तुलनेत शुक्रवारी प्रति १० ग्रॅम ५८ हजार ३७४ रुपयांवर उघडला. विशेष म्हणजे जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत घट नोदंवली गेली आहे.

ITR Filing 2023: रिफंड क्लेम करून खात्यात एक रुपया येणार नाही; पाहा हा आयकर नियम…
दुसरीकडे सोन्याच्या घसरणीसह चांदीची किंमतही आपटली आहे. MCX वर शुक्रवारच्या सत्रात चांदीच्या दरात घसरण होत असून चांदीचा सप्टेंबर वायदा ७० हजार २८५ रुपये प्रति किलोवर खुला झाला, जो गुरुवारी ७० हजार ३२४ रुपयांवर बंद झाला होता. याशिवाय चांदीचे डिसेंबर फ्युचर्स ७१ हजार ७१२ रुपयांवर घसरले आहेत.
यशाचा अंबानी फॉर्म्युला! शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या धीरूभाईंचे सक्सेस मंत्र, तुम्हालाही करू शकतात श्रीमंत
सोन्या-चांदीचा जागतिक भाव
शुक्रवारी सोन्याच्या जागतिक किमतीत वाढ होताना दिसत आहे. कॉमेक्सवर सोन्याचे जागतिक फ्युचर्स ०.०७% किंवा $१.३० च्या वाढीसह $१९१६.७० प्रति औंसवर व्यापार करत होती. त्याच वेळी, शुक्रवारी कॉमेक्सवर चांदीच्या जागतिक वायदा किमतीत घसरण झाली आणि कॉमेक्सवर शुक्रवारी सकाळी चांदी ०.०१% किंवा ०.०४ डॉलरने घसरून २२.८८ डॉलर प्रति औंस झाली.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

सोन्याचे हॉलमार्कनुसार कॅरेट
देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत त्याच्या शुद्धतेनुसार दररोज ठरवली जाते. भारतीय मानक संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध असले तरी त्याचा दागिने बनवण्यास वापर केला जात नाही. २२ कॅरेट सोने जवळपास ९१% शुद्ध असून यात ९% इतर धातू असतात आणि दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here