रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे उपविभाग, कर्जत यांच्याकडून सात जुलै रोजी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार पाताळगंगा नदी, खालापूर ही नदी पाणी पातळी – १८.८५ मी वरून वाहत आहे इशारा पातळी – २०.५० मी आहे तर धाेका पातळी – २१.५२ मी. आहे. कोल्हापूर तालुक्यातील भिलवले हा बंधारा शंभर टक्के भरला असून काही प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
खेड जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने खेड नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले असून या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहे. जगबुडीनदीने सहा मीटरची पातळी ओलांडल्यानंतर खेड शहर परिसरातील जगबुडी नदीच्या नागरिकांना भोंगा वाजवून अलर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली की नागरिकांना सूचना देण्यासाठी नगरपरिषदेकडून भोंगा वाजवला जातो तसा अलर्ट यावर्षी पहिल्यांदाच दोन दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. परसुदेवाने पाऊस त्यावेळी ठरल्याने धोका टळला होता. कोकणात पुढील दोन ते तीन दिवस देण्यात आलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
जगबुडी नदीच्या काठावर असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांनाही अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, वेळ पडल्यास या नागरिकांना येथून हलवण्याची तयारी खेड नगरपरिषद प्रशासनाने ठेवली आहे. खेड नगरपरिषदेचे आपत्कालीन पथक व प्रशासन सज्ज आहे. शुक्रवारी सकाळी खेड शहरात मच्छी मार्केटच्या जवळ अद्याप पाणी आलेले नसल्याने तूर्तासतरी कोणताही धोका नसला तरी पाऊस थांबत नसल्याने मुसळधार पाऊस पडत असल्यानेजगबुडी नदीच्या पाण्यात कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते अशी परिस्थिती आहे.खेड तालुक्याच्या वरील बाजूस असलेल्या सह्याद्रीच्या कोयना खोऱ्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने जगबुडीच्या पाणी पातळीत कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते. खेड शहरातली व्यापारी व नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घेण्याची सुरुवात केली आहे. दरम्यान पावसाचा जोर दिवसभर असाच राहिल्यास खेड जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर खेड शहर परिसरातील नागरिक,व्यापारी सावध झाले आहेत खेड नगर परिषद व तालुका प्रशासन या सगळ्यावर लक्ष देऊन असून सज्ज आहे.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News