अनेकदा असं होतं, की ४-५ महिने एखादी चाल सुचत नाही. पण, कधीतरी एक दिवस सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक एक सुंदर चाल जन्माला येते. आशीर्वादाचा प्रवाह असल्याशिवाय सर्जनशील कलाकृती घडत नाहीत असं मला वाटतं. माझ्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद सर्व काही आहे. एक भक्त म्हणून गणपतीच्या मूर्तीकडे मी तासनतास बघत राहू शकतो. त्या मूर्तीकडे नुसतं बघत राहिल्यानंतरही एक समाधान मिळत असतं.
गणेशोत्सवाच्या काळातला तो आध्यात्मिक, धार्मिक भाव मला खूप भावतो. वडील-मुलगा ताटात गणपतीची मूर्ती घेऊन घरी येतात. त्यांना ओवाळलं जातं. नंतर ते घरात येतात. नकळतपणे संस्कार होण्याचं हे एक माध्यम आहे. लहानपणी गणेशमूर्ती निवडण्यासाठी मी वडीलांबरोबर जायचो, तेव्हा मी मूर्तीची निवड करताना गणपतीचे डोळे प्रथम पाहायचो. आता माझी मुलं शुभंकर आणि अनन्या हेदेखील गणेशमूर्तीचे डोळे बघूनच मूर्ती निवडतात. यंदा मूर्ती निवडण्यासाठी आम्हाला सव्वा तास लागला. गणपतीच्या डोळ्यांत बघताना मला कायम असं वाटतं, की त्या मूर्तीशी माझं काहीतरी आंतरिक नात आहे. आपलं एखादं सार्वजनिक मंडळ वगैरे असल्यासारखी तयारी आमच्याकडे दोन महिने आधीपासून सुरू होते. गणपतीची आरती करताना मी शुभंकर आणि अनन्या या दोघांकडेही थोडा थोडा वेळ आरतीचं ताट देतो. मला असं वाटतं की काही बदलांची सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे. मला देवभोळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण, मी अंधश्रद्धाळू नक्कीच नाही. गणपती घरी आल्यानंतर मी त्या मूर्तीकडे बघत २१ वेळा अथर्वशीर्ष म्हणतो. कालच मी मुलांना अथर्वशीर्ष अर्थासकट समजावून सांगितलं.
बाप्पाला आणि आईला नमस्कार न करता मी आजही कार्यक्रमासाठी घराबाहेर पडत नाही. ” असं म्हटल्याशिवाय माझा कुठलाही दौरा सुरु होत नाही. मी जेव्हा एकटा दौऱ्यावर असतो तेव्हा मनातल्या मनात ते म्हणत असतोच. कुठलाही कार्यक्रम सुरू होण्याआधी एक मिनिट शांतपणे डोळे मिटून बाप्पाचं स्मरण करून ती मैफल गणरायाच्या स्वाधीन करतो. या क्षेत्रात २० वर्ष काम केल्यानंतर गणपती बाप्पानंच परवानगी देऊन ‘हे गजवदन’सारखी नांदी माझ्याकडून करुन घेतली. आज अनेक गणेशोत्सवात, अनेक कार्यक्रमांची सुरुवात या नांदीनं होते. रसिकांना कार्यक्रमाची सुरुवात त्याने करावीशी वाटते ही एक संगीतकार म्हणून अतिशय समाधानकारक अशी गोष्ट आहे.
सगळ्या नातेवाईकांनी एकत्र येऊन आरती म्हणणं किंवा मंत्रपुष्पांजली म्हणतानाचा तो ध्वनी, नाद हे सगळं आठवून उत्सवामध्ये अपूर्णता वाटतेय. पण, गर्दी, रोषणाई, ढोल-ताशा यांचा आवाज नाही याचं जास्त वाईट वाटत नाही. गणेशोत्सवातल्या कार्यक्रमांचा माहोल काहीसा निराळाच असतो. त्यामुळे त्यांची नक्की आठवण येतेय. लोकांच्या भावना या उत्सवामध्ये खूप जवळून बघता येतात. लोक शांत बसून अथर्वशीर्ष किंवा गणपतीच्या पूजेत लिहिल्याप्रमाणे ‘यथायोग्य’ गायन, वादन किंवा नृत्य सादर करतील तेव्हा खरा उत्सव साजरा होईल. बाप्पाला शरण जाणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या वेळेला तळ्यातल्या गणपतीसमोर जाऊन १०-१५ मिनिटं शांत बसतो. तुम्ही ध्यान लावून बसलात, तर तुम्हाला ज्ञान, कला सगळं सापडत जातं असा माझा विश्वास आहे. कुठेतरी माथा टेकणं माणसासाठी गरजेचं असतं. तो म्हणजे बाप्पा आहे असं मला वाटतं.
जी. ए. कुलकर्णींनी कवी ग्रेस यांना लिहिलेल्या एका पत्रात फार सुंदर वाक्य लिहिलं होतं की, ‘आरती झाल्यानंतर पुजारी एखाद्यालाच प्रसाद घ्यायला पुढे बोलावतो.’ तसंच गणपती आणि सरस्वती देवी काही लोकांनाच नवीन काहीतरी रचण्याची शक्ती देतात. गेली २५ वर्ष मला अनेक मुलाखतींमध्ये इतक्या मधुर चाली सुचण्याचं रहस्य विचारलं गेलं. मी कायम एकच उत्तर देतो की ‘गणपती बाप्पा मोरया’!
शब्दांकन : गौरी भिडे
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Thank you ever so for you article post.
Like!! Thank you for publishing this awesome article.