सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील १४ वर्षीय मुलीचं छत्रपती संभाजीनगर शहरातील १८ वर्षीय मुलासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून सूत जुळलं. “साथ जियेंगे, साथ मरेंगे”, अशा आणाभाका घेत प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं. घरच्यांना मैत्रिणीला भेटायला चालले, असं सांगत ती थेट पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला त्याला भेटण्यासाठी आली. मुलाच्या नातेवाईकांच्या लक्षात येतात त्यांनी दोघांना वाळुज एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी मुलीची समजूत काढून पालकांच्या ताब्यात दिलं.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १८ वर्षीय शुभमसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये संभाषण वाढलं आणि दोघांनी “साथ जियेंगे, साथ मरेंगे” अशा आणाभाका घेतल्या. वेरूळ येथील शुभमची घरची परिस्थिती नाजूक तर मुलीची घरची परिस्थिती देखील जेमतेम आहे. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रेम प्रकरणात प्रियकराची भेट झाली नव्हती. यामुळे प्रियकराला भेटण्यासाठी मुलीने संभाजीनगरला येण्याचा निर्णय घेतला.

मुंडे भावंडांची दिलजमाई, पंकजांकडून धनूभाऊंचं औक्षण, मायेनं जवळ घेतलं, व्हिडिओ समोर
दरम्यान, ३ जुलै रोजी संबंधित मुलीने घरच्यांना मैत्रिणीकडे चालले, असं सांगत संभाजीनगर गाठायचा निर्णय घेतला. ती पुण्यावरून बसने वेरूळच्या दिशेने निघाली. घरच्यांना ही बाब कळू नये यासाठी तिने मोबाईलमधील सिमकार्ड रस्त्यात काढून फेकलं. त्यानंतर ती थेट वेरूळला पोहोचली. यावेळी शुभम तिला त्याच्या आत्याच्या घरी घेऊन गेला.

शुभम आणि संबंधित मुलीचं प्रेम प्रकरण असून ती अल्पवयीन आहे. तसेच ती शुभमसोबत लग्न करण्यास आग्रही आहे. त्यामुळे हे प्रकरण अंगलट येऊ शकतं, असं शुभमच्या नातेवाईकांच्या लक्षात आलं. यावेळी शुभमच्या नातेवाईकांनी मुलीला आणि मुलाला वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान, वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुलीची समजूत काढून मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Konkan Rain Alert: मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने गाठली इशारा पातळी, खेडच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here