नवी दिल्ली : पॅन कार्ड तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२३ होती आणि केंद्र सरकारने प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी मुदतवाढ दिली नाही. अशा स्थितीत ज्यांनी पॅन-आधार लिंक केले नाही, त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले असेल. त्यामुळे आता तुमचे पॅन असणे किंवा नसणे एकसमान आहे. तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यामुळे आता तुम्हाला काही सेवांचा फायदा घेता येणार नाही. तसेच जर तुम्ही अद्याप तुमचा आयकर रिटर्न फाईल केला नसेल तर तुम्ही आधारही पॅन कार्ड लिंक केल्याशिवाय करू शकणार नाही. निष्क्रिय पॅनचा एक परिणाम म्हणजे ३१ जुलै २०२३ च्या अंतिम मुदतीपूर्वी तुम्ही तुमचा आयकर रिटर्न (ITR) भरू शकणार नाही.

ITR Filing 2023: रिफंड क्लेम करून खात्यात एक रुपया येणार नाही; पाहा हा आयकर नियम…
करदात्यांना बसेल ६ हजारांचा दंड
पॅन निष्क्रिय झाल्याने पॅन धारकाचे बरेच नुकसान होईल, विशेषतः जेव्हा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. जर तुम्ही आता मोठा दंड भरून तुमचा पॅन कार्ड पुन्हा कार्यरत होण्याची वाट पाहत असाल तर तुम्ही ITR दाखल करण्याची अंतिम मुदत चुकण्याची शक्यता आहे. तसेच जर तुमचे उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास उशीर आयकर रिटर्न भरल्यास तुम्हाला ५००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

अशा परिस्थितीत जर तुमचा पॅन सध्या निष्क्रिय असल्यास तुम्हाला उशिरा आयकर शुल्क म्हणून ५ हजार रुपये भरावे लागतील आणि बिलेटेड ITR भरावा लागेल. याव्यतिरिक्त आता तुमचा पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी १००० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल, परिणामी एकूण तुम्हाला ६ हजार रुपयाचा फटका बसेल.

ITR Filing: पगारदारांनो, फॉर्म-१६ मिळालाय मग तपासा या डिटेल्स, नाहीतर होऊ शकतं नुकसान…
दुसरीकडे, लक्षात घ्या की जर तुमचे एकूण उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त नसेल, तर विलंबित ITR साठी उशीरा भरण्याचे शुल्क एक हजार रुपये असेल, परिणामी तुम्हाला (पॅन-आधार लिंकिंग शुल्कासह) एकूण दोन हजार रुपये भरावे लागतील. त्यामुळे करदात्यांना सल्ला दिला जातो की त्यांनी शक्य तितक्या लवकर त्यांचे आधार पॅनशी लिंक करा आणि ३१ जुलैच्या देय तारखेपर्यंत त्यांचे आयकर रिटर्न भरावेत. परंतु अंतिम मुदत पर्यंत आयकर रिटर्न भरण्यास अपयशी ठरल्यास ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विलंबित रिटर्न भरू शकतात. निर्दिष्ट व्यवहारांसाठी ऑपरेटिव्ह पॅन कोट करण्यात अयशस्वी झाल्यास गुंतागुंत होऊ शकते.

प्राप्तिकर भरताना या चुका टाळा

विलंबित ITR वर दंड
विलंबित आयटीआर दाखल केल्याने दंड आकारला जाऊ शकतो जसे की न भरलेल्या कर दायित्वावरील व्याज आणि वेळेवर दाखल करणार्‍यांना काही वजावट आणि फायदे मिळतात. याशिवाय छाननीचे मूल्यांकन आणि विसंगती आढळल्यास संभाव्य दंडाची शक्यता देखील वाढवू शकते.

ITR भरताना ही सूट घ्यायला विसरू नका, कराचा बोजा कमी होण्यास मदत होईल
दुसरीकडे, जर तुम्ही ३० जून २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी पॅन-आधार लिंकिंगसाठी दंड भरला असेल, तर आयकर विभाग तुमच्या केसचा योग्य विचार करेल. तुमचा पॅन आधारशी लिंक केल्याने आणि वेळेवर आयटीआर फाइल केल्याने तुम्हाला उशीर झालेल्या आयटीआरशी संबंधित उशीरा फाइलिंग शुल्क टाळण्यास मदत होईल. तसेच जर तुम्ही ३० जून २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी आयकर रिटर्न भरला आहे, परंतु अद्याप तुमचे पॅन आधारशी लिंक नसेल, तर लिंक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आयटीआरवर प्रक्रिया केली जाणार नाही. आयकर रिटर्न प्रभावीपणे भरण्यासाठी आणि कोणताही प्रलंबित परतावा मिळवण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड वैध असणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here