सांगली : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज सांगली दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुष्मिता जाधव या महिला पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र स्थापन करा या मागणीचे निवेदन देण्यासाठी इस्लामपूर येथे गेल्या होत्या. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडे असणारे निवेदन काढून घेत त्यांना नजरकैदेत ठेवले.
ठाकरे गटाला मोठा धक्का, नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
त्याचबरोबर पोलिसांकडून गाडीमध्ये बसवून त्यांना सांगलीतील राष्ट्रवादी कार्यालयात आणून सोडण्यात आले. या घटनेमुळे सांगलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. त्याचबरोबर न्यायिक मार्गाने आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो असता आमची गळचेपी केल्याचा आरोपही महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर सांगलीतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ज्यांना आमिष दाखवून फोडलं त्यांच्यावर मला हसू येतं,शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांची आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली

सध्या राज्यात राजकारणाला वेगळं वळण आहे. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत इतर नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या सत्तांतरानंतर महाराष्ट्रात सर्व स्तरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here